शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून होणार समायोजन, डी.एड. बेरोजगारांचे आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 25, 2024 18:32 IST

संपूर्ण महाराष्ट्राला होणार फायदा

मनोज वारंगओरोस : स्थानिक डी एड बेरोजगारांना जिल्ह्यात कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून सामावून घेतले जाईल. तसेच स्थानिक डी.एड. पदवीधारक बेरोजगारांना अडसर ठरणारे निकष बदलून स्थानिकांना संधी मिळावी या दृष्टीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीत निर्णय घेतले आहेत. या नव्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत गेले दहा दिवस भरपावसात सुरू ठेवलेले आंदोलन डी.एड. बेरोजगारांनी गुरुवारी तूर्तास स्थगित केले आहे.शिक्षणसेवक म्हणून सामाऊन घ्यावे या मागणीसाठी डी. एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने गेली दोन वर्षे लढा दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून गेले दहा दिवस स्थानिक वेळ बेरोजगार आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. याची दखल घेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी डी.एड. बेरोजगार समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले होते. या चर्चेसाठी सर्व संबंधित अधिकारी मंत्री आमदार उपस्थित होते.शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत डी.एड. बेरोजगारांच्या समस्या जाणून घेत डी.एड. बेरोजगाराला अडचणीचे ठरणारे निकष बदलण्याचा निर्णय घेतला. तर स्थानिक डी.एड. बेरोजगाराला संधी मिळावी या दृष्टीने काही सकारात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आले. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री यांनी पोलिस भरती प्रमाणे शिक्षक भरतीदेखील जिल्हानिहाय करण्याचे आदेश आयुक्तांना दिले.१५ हजार मानधन मिळणारकमी पटसंख्येच्या शाळातील रिक्त जागांवर पूर्ण कायमस्वरूपी शिक्षकासोबत कंत्राटी तत्त्वावर शिक्षणसेवक देण्यात येणार आहे. या कंत्राटी शिक्षकाला काढता येणार नाही, असा ठराव बैठकीत घेण्यात आला. कंत्राटी स्वरूपात घेण्यात आलेल्या शिक्षणसेवकास १५ हजार रुपये मानधन ठरविण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला होणार फायदाशालेय शिक्षण मंत्री यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरी निकष पाहता विशेष बाब म्हणून निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील डी.एड. बेरोजगार यांची उपासमार पाहता हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डी. एड. बेरोजगार संघटनेच्या वतीने सातत्याने केलेल्या मागणीचा फायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावरील स्थानिक डी.एड. पदविका धारक डी.एड. बेरोजगारांना होणार आहे. तसेच कंत्राटी शिक्षणसेवक नियुक्तीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला न देता मुख्य कार्यकारी अधिकारी/ शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत.जिल्ह्यात परीक्षा केंद्र निर्माण करण्याचे आश्वासनस्थानिक डी.एड. पदविकाधारक उमेदवारांना नियुक्त्या ह्या लगतच्या गावात किंवा त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी देण्यात येतील, असे या बैठकीत ठरविण्यात आले. तसेच जिल्ह्यातील डी.एड. पदविकाधारक उमेदवारांना कायमस्वरूपी शिक्षक या पदासाठी आवश्यक असलेली टीईटी परीक्षा देणे सुलभ व्हावे यासाठी ऑनलाइन प्रशिक्षणाची सोय तसेच जिल्ह्यात परीक्षा केंद्र निर्माण केले जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत दिले असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय फाले यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षकDeepak Kesarkarदीपक केसरकर agitationआंदोलन