आडेलीतील रूग्णवाहिका वर्षभर बंदावस्थेत
By Admin | Updated: July 25, 2014 22:53 IST2014-07-25T22:41:24+5:302014-07-25T22:53:25+5:30
वेतोरे, खानोली, दाभोली, मठ, वजराठ येथील रुग्णांना या रुग्णवाहिकेचा फायदा होता

आडेलीतील रूग्णवाहिका वर्षभर बंदावस्थेत
वेंगुर्ले : आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेले १३ महिने बंदावस्थेत असल्याने परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. ही रुग्णवाहिका १५ आॅगस्टपूर्वी दुरुस्ती न केल्यास आडेली ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आडेली शिवसेना प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य विष्णू कोंडसकर यांनी दिला आहे. आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला २८ जून २०१३ मध्ये मठ येथे अपघात झाला होता. तेव्हापासून ही रुग्णवाहिका अद्याप दुरुस्त केली नसून ती आरोग्य केंद्रामध्ये बंदावस्थेत आहे.
वेतोरे, खानोली, दाभोली, मठ, वजराठ येथील रुग्णांना या रुग्णवाहिकेचा फायदा होता. परंतु ती बंदावस्थेत असल्याने या गावातील रुग्णांची गैरसोय होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असूनही याबाबत प्रशासनाने गेल्या वर्षभरात कोणतीही उपाययोजना केलेली नाही.
१५ आॅगस्टपर्यंत रुग्णवाहिका सेवेत न आल्यास शिवसेना व आडेली ग्रामपंचायतीच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विष्णू कोंडसकर यांनी दिला
आहे. (प्रतिनिधी)