दोन डंपरवर कारवाई
By Admin | Updated: December 4, 2014 23:40 IST2014-12-04T22:28:40+5:302014-12-04T23:40:10+5:30
अनधिकृत वाळू वाहतूक : एक लाखाचा दंड

दोन डंपरवर कारवाई
मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन डंपरवर आज तोंडवळी येथे मालवणच्या महसूलच्या विभागाने एक लाख ७00 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून मालवणच्या महसूल विभागाने कारवाई करण्याच्या दृष्टीने विविध पथके कार्यरत केली आहेत. आज, गुरुवारी महसूल विभागाने आचऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन डंपरवर कारवाई केली. आज तोंडवळी फाटा येथे विनायक संदेश तेली यांच्या डंपरमध्ये दीड ब्रास वाळू आढळून आली. त्यांना ४0 हजार ३00 रुपयांचा दंड करण्यात आला. आणखी एका वाळू व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार वनिता पाटील यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)