मडगावात कारवाई : पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

By Admin | Updated: January 10, 2015 00:20 IST2015-01-09T23:39:55+5:302015-01-10T00:20:26+5:30

धिक तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

Action in Madgaon: Pistol, three live cartridges seized | मडगावात कारवाई : पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

मडगावात कारवाई : पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

मडगाव : खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यानंतर गोव्यात पळून आलेल्या फैक मुश्ताक अहमद करंबेळकर (वय ३५) याच्या मडगाव पोलिसांनी काल, गुरुवारी रात्री मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एक स्विफ्ट कार, एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. पिस्तुलावर सेड पिस्तूल अँड बेनेटा, मेड इन युएसए असा उल्लेख आहे.
करंबेळकर याच्याविरुद्ध शस्त्र कायदा १९५९ च्या कलम ३ व २५ नुसार मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
करंबेळकर हा रत्नागिरीतील मिल्लतनगर, शिवाजीनगर येथील रहिवाशी आहे. गेले दीड वर्षे तो नागमोडे - नावेली येथे भाडयाच्या घरात राहत होता. कालकोंडा येथील आवलेथ येथे संशयिताचा गेले अनेक दिवस वावर होता. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. ही व्यक्ती वारंवार मोबाईलवरून कुणाशी तरी बोलत असायची, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या संशयाने पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीस खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी खरी माहिती सांगितली.
नागमोडे येथे फेलिना कॉस्तांसियो रुझारियो कुलासो या महिलेच्या घरात तो भाडेकरू म्हणून रहात होता. भाडेकरू ठेवताना ‘सी’ फॉर्म भरुन भाडेकरूविषयी संपूर्ण माहिती पोलिसांना कळविणे कायद्याने बंधनकारक असते. मात्र, या घरमालकीणीने ती तसदी घेतली नव्हती. या घरमालकीणीवरही आता कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
करंबेळकर याच्याकडे (एमएच 0२ एयू ३४९५) असणारी स्विफ्ट कार जप्त केली असून, सदर कार मुंबई येथील नारायण पसारे यांच्या नावावर असल्याचे तपासात आढळून आले आहे. रत्नागिरीत व्यवसाय असून, तेथे स्वत:ची तीन दुकाने असल्याचे सांगताना मडगावात आपण पॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करीत होतो, असेही हा संशयित पोलिसांना सांगत आहे.
अटक करताना त्याच्या अंगावर सोन्याचे दागिनेही होते. मडगाव भागातील एका सोनाराकडून आपण हे दागिने करून घेतले होते, असे त्याने सांगितले असून, खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी या सोनाराला बोलावून घेतले आहे.
जप्त केलेले पिस्तूल हे राजकुमार उके याच्याकडून घेतल्याचे तो पोलिसांना सांगत आहे. उके याला एका प्रकरणात पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो तुरुंगात आहे.
सायन कोळीवाडा येथे करंबेळकर याचे काही मित्र आहेत. त्याने विशाल आमकर, अनिल आमकर, संदीप पवार व राजकुमार उके अशी काही नावे पोलिसांना सांगितली आहेत. यासंबधीची माहिती महाराष्ट्र व मुंबई पोलिसांनाही कळविली आहे. लवकरच तेथील पोलिसांचे एक पथक मडगावात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक मोहन नाईक यांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित उमर्ये व मडगाव एलआयबी पोलीस पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक कमलाकार कोठारकर, हवालदार सावळो नाईक ऊर्फ एमआरफ, सुभाष नाईक, शेखर राऊत व विकास कौशिक यांनी केली. (प्रतिनिधी)

फेब्रुवारी २00७ साली रत्नागिरी येथील फैयाझ हकीम याच्या खूनप्रकरणात करंबेळकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. नाशिक येथील कारागृहात तो ही शिक्षा भोगत होता. आॅक्टोबर २0१0 साली त्याला तीन महिन्यांचा पॅरोल संमत झाला होता. त्यानंतर काही दिवस रत्नागिरी व नंतर मुंबईला आपल्या मित्रांसमवेत राहिल्यानंतर दोन वर्षापूर्वी त्याने आपले बस्तान मडगावात हलविले होते. मुंबईत असताना करंबेळकर याने घाटकोपर येथे एका इसमावर खुनी हल्ला चढविला होता. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद आहे.

Web Title: Action in Madgaon: Pistol, three live cartridges seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.