जमीन हद्दीवरून तिथवलीत हाणामारी

By Admin | Updated: May 28, 2014 01:35 IST2014-05-28T01:05:14+5:302014-05-28T01:35:47+5:30

परस्परविरोधी तक्रारी पोलिसात दाखल

Action on the ground from the land boundary | जमीन हद्दीवरून तिथवलीत हाणामारी

जमीन हद्दीवरून तिथवलीत हाणामारी

वैभववाडी : जमिनीच्या मोजणीनंतर हद्दीवरून तिथवली बौद्धवाडी येथे हाणामारी झाली. याबाबत परस्परविरोधी तक्रारी पोलिसात दाखल झाल्या आहेत. ही घटना सोमवारी घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तिथवली बौद्धवाडी येथील गंगाराम खताजी तांबे यांनी आपल्या मालकीची जमीन गावातीलच महंमद काझी यांना विकली. त्यामुळे काझी यांनी त्या जमिनीची मोजणी करून घेतली. मोजणीच्या हद्दीवर प्रदीप शांताराम तांबे यांनी खुंट्या मारल्या. त्याबाबत गंगाराम तांबे यांनी प्रदीपला विचारले तेव्हा त्याने गंगारामचा मुलगा गितेशला मारहाण केली असे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान प्रदीपने मारलेल्या खुंट्या गंगाराम व त्यांचा मुलगा गितेश यांनी काढून टाकल्या. त्याबाबत प्रदीपने जाब विचारला असता पितापुत्रांसह अशोक खतजी तांबे यांनी प्रदीपला शिवीगाळ करीत धमकावले तर अपर्णा अशोक तांबे हिने प्रदीपची आई नंदा हिला मारहाण केल्याची तक्रार प्रदीपने दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Action on the ground from the land boundary