ज्वेलर्स चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत बीडमध्ये कारवाई : नऊ गुन्हेगारांचा समावेश, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
By Admin | Updated: May 9, 2014 00:18 IST2014-05-09T00:18:49+5:302014-05-09T00:18:49+5:30
सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी येथील दत्तप्रसाद मसुरकर यांच्या ज्वेलर्समधून आठ दिवसांपूर्वी सात लाख रुपयांच्या सोन्याची चोरी करून फरार झालेल्या टोळक्यातील एका आरोपीच्या

ज्वेलर्स चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत बीडमध्ये कारवाई : नऊ गुन्हेगारांचा समावेश, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी येथील दत्तप्रसाद मसुरकर यांच्या ज्वेलर्समधून आठ दिवसांपूर्वी सात लाख रुपयांच्या सोन्याची चोरी करून फरार झालेल्या टोळक्यातील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे. नितीन भास्करराव पोपटघट (वय २६) असे या आरोपीचे नाव असून त्याला बीड जिल्ह्यातील गेवराई लोहारगल्ली येथील त्याच्या राहत्या घरी बुधवारी सायंकाळी ७ वाजता मोठ्या शिताफीने या पथकाने ताब्यात घेतले आहे. या चोरी प्रकरणात एकूण ९ गुन्हेगारांचा समावेश असून, यात ५ महिलांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई येथील कावेरी काळे, सोनी, शीतल, शेवंत व अन्य एक महिला तर नितीन पोपटघट, उमेश परदेसी तसेच दोन मुले ्रअशा एकूण नऊजणांनी२९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता या टोळीने कणकवली येथील दीपक बेलवलकर यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश केला. मात्र, तेथे चोरी करण्याचा डाव फसल्यामुळे ही टोळी पांढर्या रंगाच्या स्वीफ्ट कारमधूनरवाना झाली. सावंतवाडी येथील दत्तप्रसाद मसुरकर यांच्या ज्वेलर्स शॉपमधून सोने चोरी करण्याच्या इराद्याने या महिलांनी त्या शॉपमध्ये प्रवेश केला. यातील नितीन पोपटघट हा कारमध्येच बसला होता. महिलांनी शॉपमध्ये प्रवेश करताच तेथील २५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या त्यातील एका महिलेने चोरल्या. त्याबाबतचे चित्रीकरणही सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये कॅच झाले होते.