शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आचरा बायपास रस्त्याच्या कामाला चालना, पोस्ट खात्याच्या उदासीनतेमुळे रखडले होते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 18:21 IST

कणकवली: आचरा बायपास रस्त्याच्या कामाला आता चालना मिळाली आहे. या रस्त्यात येणारी पोस्ट खात्‍याची जागा नगरपंचायत भूसंपादन प्रक्रियेद्वारे ताब्‍यात ...

कणकवली: आचरा बायपास रस्त्याच्या कामाला आता चालना मिळाली आहे. या रस्त्यात येणारी पोस्ट खात्‍याची जागा नगरपंचायत भूसंपादन प्रक्रियेद्वारे ताब्‍यात घेणार आहे. त्‍यासाठी १० लाख रूपयांच्या मोबदला रक्‍कमेची तरतूद नगरपंचायतीने केली आहे. त्‍यामुळे लवकरच ही जागा नगरपंचायतीच्या ताब्‍यात येऊन आचरा पर्यायी रस्ता खुला होणार आहे. हा रस्ता तयार झाल्‍यानंतर आशिये, कलमठ गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच वाहन चालकांची वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.कणकवली-आचरा या मार्गाचा देवगड आणि मालवण तालुक्‍यांतील अनेक गावांत जाण्यासाठी वापर होतो. यातील कणकवली शहर ते कलमठ बाजारपेठपर्यंतचा रस्ता कमी रुंदीचा असल्याने तसेच या मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ असल्याने सातत्‍याने वाहतूक कोंडी होते.या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी शहरातील एस.टी. बसस्थानक लगतची पोस्टाची जागा ते आशिये गाव, तेथून कलमठ ते वरवडे चव्हाण दुकान असा पर्यायी मार्ग काढण्यात आला. सन २००६ मध्ये या रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली त्‍यामुळे पटवर्धन चौक ते वरवडे चव्हाण दुकान पर्यंतच्या मार्गाचा दर्जा ग्रामीण रस्ता असा झाला. सन २०१० पर्यंत या पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र पोस्ट खात्‍याच्या जागेचा अडसर आणि कलमठ गावातील ८८ जमीन मालकांना मोबदला रक्‍कम न मिळाल्याने हा रस्ता रखडला होता.पोस्ट खात्‍याने नगरपंचायत जवळ इमारत बांधकाम परवानगी मागितली होती. यावेळी नगरपंचायत प्रशासनाने रस्त्यासाठी आवश्‍यक ते क्षेत्र सोडण्याची संमती दिल्‍यानंतरच परवानगी दिली जाईल अशी अट घातली. मात्र, पोस्ट खात्‍याकडून जागा सोडण्याबाबत काहीही कार्यवाही झाली नाही. त्‍यामुळे पोस्ट खात्‍याच्या अखत्‍यारीत येणारी जागा विकत घेण्यासाठी नगरपंचायतीकडून पोस्ट खात्‍याकडे गेली दहा वर्षे पत्रव्यवहार सुरू होता. परंतु केंद्राच्या अखत्‍यारीत येणाऱ्या पोस्ट खात्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. ५ ऑगस्‍ट २०२२ रोजी नगरपंचायतीने पोस्ट खात्‍याची जागा भूसंपादन करून ताब्‍यात घेण्याचा ठराव केला. त्‍याप्रमाणे आवश्‍यक त्‍या रस्त्याची जागा ताब्‍यात घेण्याचा प्रस्ताव देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.पोस्ट खात्‍याच्या अखत्‍यारीत येणारी जागा भूसंपादन करण्यासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांनी कणकवली प्रांताधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती केली आहे. पुढील काही दिवसांत राष्‍ट्रीय महामार्ग ते पोस्ट खात्‍याच्या अखत्‍यारीत येणाऱ्या जागेची संयुक्‍त मोजणी होणार आहे. या मोजणीत रस्त्यासाठी आवश्‍यक ते क्षेत्र तसेच जागेत असणारी झाडे व इतर मालमत्ता यांची नोंद घेऊन त्‍यानुसार मोबदला रक्‍कम निश्‍चित केली जाणार आहे. हा मोबदला पोस्टखात्‍याला वर्ग केल्‍यानंतर ही जागा नगरपंचायतच्या ताब्यात मिळणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPost Officeपोस्ट ऑफिसroad transportरस्ते वाहतूक