शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या 'ध्रुव'च्या अपघाती मृत्यूने माणगाव हळहळले; उपचारादरम्यान निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 22:59 IST

झाराप पत्रादेवी मार्गावर झाला होता अपघात, गोवा येथे सुरू होते उपचार

सावंतवाडी : मळगाव येथील आपल्या माहेरी माणगाव येथून  दुचाकीने येत असताना पाठीमागून वेगाने येणाऱ्या कारची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात माणगाव येथील मुग्धा पावसकर या जखमी झाल्या होत्या. तर या अपघातात गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा ध्रुव गौरव पावसकर (५ ) याचे गुरुवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान गोवा येथे निधन झाले. हा अपघात मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरील स्वामी धाबा सर्कलवर गुरुवारी सायंकाळी  घडला होता.  

माणगाव येथील गौरव पावसकर हे एम्. आर. म्हणून काम करतात. माणगाव दत्तमंदिर स्टॉप जवळ ते राहतात. त्यांची पत्नी मुग्धा पावसकर पूर्वाश्रमीच्या मुग्धा नाटेकर या गुरुवारी सायंकाळी उशिरा मळगाव रस्तावाडा येथील आपल्या माहेरी येत होत्या. त्यांचे आईवडील पुणे येथे मुलासोबत राहतात. दिवाळी निमित्त ते मळगाव येथील घरी आले होते. तसेच मोठी बहीणही आली होती. या सर्वांना भेटण्यासाठी त्या आपल्या ज्युपिटर दुचाकीने येत होत्या.  त्या मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरील सर्कल वरून मळगावच्या दिशेने वळत असताना पाठीमागून वेगाने आलेल्या कारची जोरदार धडक त्यांच्या दुचाकीला बसली. 

या अपघातात मुग्धा हिच्या कंबर व पायाला मोठी दुखापत झाली होती. तर मुलगा ध्रुव हा रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर दोघांनाही प्रथम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ध्रुव गंभीर जखमी असल्याने त्याला गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान ध्रुव याचे रात्री दुर्दैवी निधन झाले.या घटनेने माणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात