शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कारचालकाने दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 18:34 IST

accident, sindhudurgnews आचरा-मालवण रस्त्यावर आचरा टेंबली येथे दारुच्या नशेत असलेल्या कारचालकाने दुचाकीस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देकारचालकाने दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघात दोघे गंभीर जखमी : आचरा येथील घटना

आचरा : आचरा-मालवण रस्त्यावर आचरा टेंबली येथे दारुच्या नशेत असलेल्या कारचालकाने दुचाकीस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले.या अपघाताची भीषणता एवढी होती की दुचाकी व त्यावरील पितापुत्र दोघेही दूरवर फेकले गेले. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा पुरता चक्काचूर झाला व दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातातील जखमींना मालवण येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात सोमवारी रात्री झाला. कार चालकावर आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत वृत्त असे की, आचरा पिरावाडीतील रहिवासी रवींद्र रामचंद्र जोशी (५७) व त्यांचा मुलगा ओंकार रवींद्र जोशी (२७) हे सोमवारी रात्री आपल्या ताब्यातील दुचाकीने मालवणवरून आचऱ्याच्या दिशेने येत होते. आचरा येथे पोहोचण्यासाठी काही मिनिटांचे अंतर असताना आचरा टेंबलीनजीक आले असता मागून भरधाव वेगाने कार घेऊन येणारे चेतन गजानन राऊळ (२८, रा. पिंगुळी मठ) यांनी जोशी यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकीसह पिता-पुत्र जोशी हे दूर फेकले गेले. यात रवींद्र जोशी यांच्या पायाला तर ओंकार जोशी यांच्या डोक्याला व पाठीला मार लागला.कार चालविणारे राऊळ हे दारुच्या नशेत होते असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. कारचालक राऊळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल देसाई व चव्हाण करीत आहेत....अन्यथा मोठा अनर्थ घडला असतापिंगुळी येथील चेतन राऊळ हे भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील कार घेऊन आचरा दिशेला येत होते. सुरुवातीला रस्त्यावर असलेल्या बैलाला त्यांच्या कारची धडक बसली. त्यानंतर पुढे जात असलेल्या जोशी यांच्या दुचाकीस धडक बसली. बैलास धडक बसल्याने कारचा थोडा वेग कमी झाला असल्याने दुचाकीला बसलेल्या धडकेची तीव्रता कमी होती. ते ज्या वेगात आले त्या वेगात धडक बसली असती तर मोठा अनर्थ ओढवला असता, असे बोलले जात आहे.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग