शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भुईबावड्यात एसटी बस-टेम्पोमध्ये अपघात, ४ प्रवासी गंभीर जखमी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 12, 2024 13:10 IST

प्रकाश काळे वैभववाडी : भुईबावडा-रिंगेवाडी दरम्यान एका तीव्र वळणावर एसटी बस व आयशर टेम्पोमध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. ...

प्रकाश काळेवैभववाडी : भुईबावडा-रिंगेवाडी दरम्यान एका तीव्र वळणावर एसटी बस व आयशर टेम्पोमध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. ही घटना आज, बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात एसटी बसमधील सुमारे २० प्रवाशांना किरकोळ तर ४ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले असून उर्वरित प्रवाशांवर भुईबावडा येथील जिल्हा परिषद रुग्णालयात उपचार करुन सोडण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी की, विजयदुर्ग-पुणे एसटी बस व गगनबावड्याहून भुईबावडा मार्गे येणाऱ्या आयशर टेम्पो या दोन वाहनांमध्ये रस्ता अरुंद असल्याने समोरासमोर धडक बसली. या धडकेत एसटी बसचा चालकाकडील दर्शनी भाग दबला गेला. धडक मोठी असल्याने एसटीमधील २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून यातील ४ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. एसटीत एकूण ६५ प्रवासी प्रवास करीत होते. या प्रवाशांना पुढील उपचारासाठी वैभववाडी येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित प्रवाशांना भुईबावडा येथील डॉ. रविंद्र सावंत यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर सोडण्यात आले आहे. यावेळी वैभववाडी पोलिस निरीक्षक अवसरमोल, तावडे, जायभाय, दिलपे व पडवळ दाख झाले. भालचंद्र साठे, सरपंच बाजीराव मोरे, भुईबावडा येथीत आरटीआयचे तालुकाध्यक्ष कुणाल मोरे, शिवसेनेचे रविंद्र मोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात