शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींना एसीबीच्या नोटीसा, आमदार वैभव नाईकांच्या फंडातून झालेल्या कामांची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 13:18 IST

ग्रामपंचायतींच्या सरपंचांना एसीबीने अशाप्रकारची नोटीस बजावण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच वेळ

कुडाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी सुरू असतानाच आता त्यांच्या कुडाळ मतदारसंघातील काही ग्रामपंचायतींनाही एसीबी विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सोमवारी (३० जानेवारी)ला संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांना आमदार नाईक यांच्या फंडातून झालेल्या कामांच्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, अशा आशयाची नोटीस एसीबी रत्नागिरी विभागाने बजावली आहे. ग्रामपंचायतींच्या सरपंचांना एसीबीने अशाप्रकारची नोटीस बजावण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच वेळ आहे.शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीमार्फत मालमत्तेसंदर्भात काही दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर या विभागाकडून त्यांची चौकशी सुरू असतानाच या चौकशीला आपण भीक घालत नसल्याचे सांगत चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केली होती. अलीकडेच त्यांच्या मालमत्तेसंदर्भात एसीबी विभागाकडून मोजमापे घेण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या मतदारसंघातील काही ग्रामपंचायतींना थेट रत्नागिरी एसीबी विभागाकडून नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या फंडातून झालेल्या कामांबाबत चौकशी करून जबाब नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित कामांची सर्व कागदपत्रे, बॅंक खाते व अन्य आवश्यक कागदपत्रांसह ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, रत्नागिरी येथे उपस्थित राहावे, असे संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये एसीबी विभागाचे उपअधीक्षक यांनी नमूद केले आहे. या प्रकाराने आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे म्हटले जात असून, आमदारांनंतर आता थेट सरपंचांना एसीबी विभागाकडून चौकशीसाठी नोटीस पाठविल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक gram panchayatग्राम पंचायतAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग