शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करा, राजन तेली थेट पोचले मुख्यमंत्र्यांकडे 

By अनंत खं.जाधव | Updated: July 5, 2024 17:15 IST

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिक्षण खात्याने घेतलेला संच मान्यता निकष १५ मार्च २०२४ चा शासननिर्णय ...

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिक्षण खात्याने घेतलेला संच मान्यता निकष १५ मार्च २०२४ चा शासननिर्णय रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी दिले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण विभागाकडून ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाने शाळांच्या संच मान्यतेचे निकष निश्चित केलेले आहेत. यानुसार संच मान्यता सुरू आहे. आता  १५ मार्च २०२४ रोजी शासनाने संच मान्यतेसाठी नवीन शासन आदेश काढलेला आहे.या शासन निर्णयानुसार संच मान्यता आल्यास ग्रामीण भागातील विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापुर, ठाणे, पालघर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील शाळांना शिक्षक मान्य होणार नाहीत. त्यामुळे शाळा बंद होतील आणि ग्रामीण भागातील मुले शिक्षणा पासून वंचित राहतील. प्रत्येक वर्गात २० पटसंख्या ही अट १५ मार्च च्या शासननिर्णयामध्ये आहे. त्यामुळे या निकषामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद होतील. या शासन निर्णया  मध्ये १५० मुलांसाठी मुख्याध्यापक ही अट ठेवल्याने अनेक शाळांना मुख्याध्यापक मिळणार नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १२५ शाळा मुख्याध्यापकांशिवाय राहतील. खरे तर शाळा तिथे मुख्याध्यापक असणे आवश्यक आहे.२८ ऑगस्ट २०२५ चा शासननिर्णयामध्ये शंभर पटसंख्येला मुख्याध्यापक पद होते व पटसंख्या कमी झाल्यास मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत संरक्षण होते. परंतु  १५ मार्च चा शासननिर्णय  मध्ये १५० पेक्षा कमी पटसंख्या झाल्यास मुख्याध्यापक पद जाईल व सदर मुख्याध्यापकास वेतन श्रेणी दिली तरी शिक्षक पदावर समायोजित केले जाणार आहेत असे या निवेदनात म्हटले आहे.२५-३० वर्षे काम केलेल्या मुख्याध्यापकास शिक्षक म्हणून कमी करणे चुकीचे होईल. तरी मार्चचा संच मान्यतेचा शासननिर्णय  रद्द करणेत यावा अशी मागणीही  तेली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली Eknath Shindeएकनाथ शिंदेTeacherशिक्षक