शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३,२३९ लाभार्थींचे 'आभा कार्ड' काढणार - आरोग्य अधिकारी धुरी 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 2, 2023 12:41 IST

आतापर्यंत ९२ हजार आभा कार्ड काढण्यात आले

सिंधुदुर्ग : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव मोहीम जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि शालेय मुलांची तपासणी आदी उप्रकम राबविले जाणार आहेत. तसेच या मोहिमेत पात्र असलेल्या ३३,२३९ लाभार्थींचे आयुष्मान भारत कार्ड काढले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गोरोले आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. सई धुरी म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे. तसेच १ सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयुष्मान भव ही महत्त्वाकांक्षी मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यात आयुष्मान आपल्या दारी ३.० अंतर्गत पात्र लाभार्थींची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वाटप केले जाणार आहे. आयुष्मान सभाअंतर्गत गावपातळीवर आयुष्मान भारत आणि आभा कार्डबाबत जनजागृती करणे, कार्ड काढणे, पात्र लाभार्थींची यादी प्रसिद्ध करणे आदी विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.

आयुष्मान मेळाव्याअंतर्गत या कालावधीत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी व रविवारी आरोग्य विषय विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या मोहिमेत अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती डॉ. धुरी यांनी दिली.

आतापर्यंत ९२ हजार आभा कार्ड१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या आयुष्मान भव मोहीम कालावधीत ज्या लाभार्थींनी अद्याप आभा कार्ड काढले नाही अशांचे आभा कार्ड काढले जाणार आहे. आतापर्यंत ९२ हजार आभा कार्ड काढण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही ३३२३९ पात्र लाभार्थींचे आभा कार्ड काढले नाही. त्यामुळे या मोहिमेत या पात्र लाभार्थींचे आभा कार्ड काढण्यात येणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्य