शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg News: अपघातात वागदेतील युवक जागीच ठार

By सुधीर राणे | Updated: August 14, 2023 12:47 IST

कणकवली: जानवलीहून वागदेच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर मनोहर शिल्प बिल्डिंग समोर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार ...

कणकवली: जानवलीहून वागदेच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर मनोहर शिल्प बिल्डिंग समोर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार गणेश उदय काणेकर(१८) हा जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. गणेश हा  जानवली येथून वागदेच्या दिशेने दुचाकीने जात होता. हा अपघात नेमका कसा घडला हे जरी स्पष्ट झाले नसले, तरी ज्या ठिकाणी दुचाकीवरून गणेश रस्त्यावर पडला तेथून त्याची दुचाकी काही अंतरावर जाऊन पडली होती. त्यामुळे तो वेगात असण्याची शक्यता पोलिसानी वर्तवली आहे. यात गणेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गणेशला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तत्पूर्वी त्याचा मृत्यु झाला होता. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, वाहतूक पोलिस विनोद चव्हाण, मिलिंद देसाई यांच्यासह अन्य स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वागदे येथील ग्रामस्थ देखील घटनास्थळी दाखल झाले होते. कणकवली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातDeathमृत्यू