शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: भिरंवडे येथील तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू, मुंबईत होता नोकरीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:31 IST

गोवा, बांबुळी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

कणकवली : भिरंवडे, कदमवाडी येथील गणेश सुरेश कदम (वय २५) या तरुणाचा गोवा, बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्याने बीएससी नर्सिंग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईतील खासगी रुग्णालयात नोकरीला होता. ताप येत असल्यामुळे व तपासणी अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याने तो उपचारासाठी गावी आला होता. खासगी रुग्णालयातील उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी गोवा, बांबुळी रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.भिरंवडे प्राथमिक शाळा व कनेडी विद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने बीएससी नर्सिंग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात गणेश कदम हा रुग्णसेवा देत होता. काही दिवसांपूर्वी त्याला ताप येऊ लागला. त्याच्या तपासणीमध्ये तो डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते.तो एकटाच मुंबईला राहत होता. तर आई, वडील व कुटुंबिय गावी राहत असल्याने रविवारी सकाळी तो भिरंवडे येथे आला होता. त्यानंतर कनेडी व कणकवली येथे खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्याला अधिक त्रास होऊ लागल्याने अधिक उपचारासाठी कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी त्याला गोवा, इबांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आरोग्य कर्मचाऱ्यांकडून भिरवंडे, कदमवाडी येथे सर्वेक्षणरुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्याचे निधन झाले. त्याच्यावर भिरंवडे येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, भाऊ, काका, काकी, बहिणी असा परिवार आहे. गणेश याचे तपासणी अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांकडून भिरंवडे, कदमवाडी येथे सर्वेक्षण करण्यात आले.