शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: विसर्जन स्थळाची स्वच्छता करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, उपसरपंच गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:30 IST

जखमी उपसरपंचाना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले

दोडामार्ग : सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मंगळवारी असल्याने विसर्जन स्थळाची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना खोक्रल येथे सोमवारी सायंकाळी घडली.सूर्याजी साबाजी कुबल (वय २५), असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेले गावचे उपसरपंच भरत लक्ष्मण गवस (३२) हे जखमी झाले आहे. त्यांना गोव्यातील म्हापसा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन असल्याने गावातील विसर्जन स्थळाची स्वच्छता करण्यासाठी सूर्याजी कुबल व गावचे उपसरपंच भरत गवस हे दोघे गेले होते. साफसफाई करत असताना तेथील विद्युत वाहिन्यांना सूर्याजी कुबल याचा स्पर्श झाल्याने त्याला जोराचा झटका बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या उपसरपंच भरत गवस यांना ही त्याचवेळी विजेचा धक्का लागला; परंतु ते बाजूला फेकले गेले. त्यांनी आरडाओरड केल्याने जवळील स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांना तत्काळ खासगी वाहनाने साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तत्पूर्वी सूर्याजी याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले. गवस यांना अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने आझिलो गोवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.