शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुगारातील पैशाच्या देवाण-घेवाणीतून रिक्षा जाळली, कणकवलीतील कलमठ येथील घटना 

By सुधीर राणे | Updated: February 23, 2023 11:49 IST

कणकवली: जुगाराच्या पैशाच्या देवाण घेवाणीतून काही युवकांमध्ये  भांडण झाले. त्यातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी काल, बुधवारी रात्री कणकवली पोलिस ठाण्यात ...

कणकवली: जुगाराच्या पैशाच्या देवाण घेवाणीतून काही युवकांमध्ये  भांडण झाले. त्यातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी काल, बुधवारी रात्री कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या रागातून तक्रारदाराला धमकी देत तुझी वाट लावतो असे सांगत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरासमोर लावलेली रिक्षा जाळून टाकल्याची खळबळजनक घटना कणकवली तालुक्यातील कलमठ येथील मठकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी घडली आहे. या घटनेसंदर्भात सुरज जाधव (कलमठ, मठकर कॉम्प्लेक्स) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्या तक्रारीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण याच्यासह आप्पा शिर्के याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपले जुगाराच्या पैशाच्या देवाण घेवाणीवरून  बुधवारी आप्पा शिर्के यांच्यासोबत भांडण झाले होते. त्यावेळी रिमेश चव्हाण, सुनील काणेकर व चेतन पाटील यांनी शिवीगाळ करत आपल्याला धमकी दिली. तसेच रिक्षाच्या मडगार्डवर दगड मारून नुकसान केले. याप्रकरणी आपण कणकवली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री चौघांविरोधात तक्रार दाखल केली होती.तेथून घरी जात असताना रिमेश चव्हाण यांनी तू रिक्षा घेऊन घरी जा तुझी वाटत लावतो अशी धमकी दिली होती. त्यानंतर आपण घरी गेलो. रात्री झोपत असताना माझ्या घराच्या खिडकीतून बाहेर आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. त्यावेळी मी घराबाहेर येऊन पाहिले असता रिमेश चव्हाण व आप्पा शिर्के हे तेथून पळताना दिसून आले.

पाणी मारून रिक्षाला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीत रिक्षा जळून बेचिराख झाली होती. तर या रिक्षाच्या बाजूला संकेत फोंडेकर यांच्या असलेल्या दोन दुचाकीना देखील आगीची झळ बसली आहे. या आगीत रिक्षेचे सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे. असेही या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात कणकवली पोलिस ठाण्यात संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआगPoliceपोलिस