शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत बारमाही वाहणारा धबधबा होणार सुरू, २ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 16:27 IST

पर्यटनाला चालना मिळणार

कणकवली :  कणकवली येथील जानवली नदीवरील गणपती साना येथे बारमाही धबधब्याच्या कामाला अखेर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे.  नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने २ कोटी ६० लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीला प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे. कणकवली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या संकल्पनेतून कणकवली जानवली गणपती साना  या ठिकाणी शहराच्या  पर्यटन विकासात मोठी भर टाकणारा हा प्रकल्प करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात काही कारणाने या कामाला निधी मंजूर झाला नाही.  त्यानंतर हे विकास काम प्रलंबित राहिले. कणकवली शहर विस्तारत असतानाच पर्यटन वाढीसाठी एक महत्त्वपूर्ण ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गणपती साना येथे जलस्त्रोतांचे सौंदर्यकरण करणे या अंतर्गत धबधबा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. जेणेकरून कणकवलीत येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यात अन्य धबधब्या ऐवजी बारमाही हा धबधबा उपलब्ध व्हावा व यातून पर्यटन विकासाला चालना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर धरून  हे काम प्रस्तावित करण्यात आले होते. गेली दोन वर्षाहून अधिक काळ हे काम प्रलंबित राहिले होते.दरम्यान, आमदार नितेश राणे यांचे अलीकडेच या प्रश्नी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी लक्ष वेधले होते. त्यानुसार आमदार  राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे  पाठपुरावा करून या कामाकरिता तातडीने निधी मंजूर करून देत प्रशासकीय मान्यता देखील मिळवून दिली.जिल्हा नियोजन समितीच्या सचिव तथा जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे  प्रशासकीय मान्यतेचे आदेश दिले असून, कणकवली शहराच्या पर्यटन विकासात मोठा टप्पा पार करणारे हे काम अखेर मंजूर झाल्याने आता हे काम केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली