शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

सावधान, सह्याद्रीचा बुरूज ढासळतोय; नाटळ गावातील पूर्वेकडचा काही भाग कोसळला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:45 IST

मिलिंद डोंगरे कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ गावाच्या पूर्वेकडील दिशेला असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील डोंगराचा काही भाग अचानक कोसळला असल्याने ...

मिलिंद डोंगरेकनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ गावाच्या पूर्वेकडील दिशेला असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील डोंगराचा काही भाग अचानक कोसळला असल्याने येथील नजीक असलेल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथे झालेल्या घटनेच्या स्मरणाने पुन्हा एकदा प्रत्येकाच्या हृदयात धडकी भरली आहे.

नाटळ गावाला तिन्ही बाजूला डोंगररांगांचे एक प्रकारचे संरक्षणच लाभले आहे. परंतु हेच संरक्षण जेव्हा काळ बनून समोर उभे ठाकते तेव्हा मात्र हृदयाचे पाणी पाणी होते. गावाच्या पूर्वेला मोठा डोंगर पसरला आहे. गावाच्या घाटमाथ्यापासून कोल्हापूर बॉर्डर सुरू होते. या घाटमाथ्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा धरणाचे पाणी पसरले आहे. या धरणाचे पाणी कित्येक वर्षे या डोंगर भागात मुरत आहे.

डोंगराचे भूस्खलन होण्याचा धोकाउन्हाळ्यातही या डोंगर भागात पाणी असते. दिवसेंदिवस पाणी मुरण्याची क्षमता वाढत असल्याने या डोंगरांचे भूस्खलन होण्याचा धोका वाढला आहे. यावर वेळीच उपाययोजना शासनस्तरावर होणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात माळीणसारखा प्रसंग घडायला वेळ लागणार नाही.

२५ ते ३० मीटर रुंदीचा भाग कोसळलायावर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. डोंगर भागात ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम म्हणून फळसाचा माळ या ठिकाणचा डोंगर कोसळला. कोसळलेला भाग खाली राहत असलेले नामदेव सावंत व त्यांचे भाऊ यांच्या घरांपासून एकदम जवळच आहे. मध्ये नदी असल्याने कोसळलेल्या भागाची माती, दगड हे थेट नदीपात्रात आले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. सुमारे २५ ते ३० मीटर एवढ्या रुंदीचा भाग व अडीचशे ते ३०० मीटर एवढ्या उंचीचा भाग खाली कोसळला आहे.

शासनस्तरावर उपाययोजनांची गरजकाही वर्षांपूर्वी या डोंगर भागात बहुतांश वेळा छोटे-छोटे भूस्खलन झालेले आहे. निसर्गानेही एक आपल्या रौद्र रुपाची झलक दाखवली आहे. भविष्यात होणाऱ्या अशा नैसर्गिक संकटांपासून येथील ग्रामस्थांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर उपाययोजना होणे गरजेचे आहे.

ग्रामस्थांना नोटिसा, विमा उतरविण्याचे आवाहनदोन वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथील डोंगर कोसळून दुर्घटना घडली होती. यात एक घर जमिनीखाली गाडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर एक जण जायबंदी झाला होता. याची दखल घेत शासनाच्यावतीने सह्याद्री पट्ट्यांतील कुंभवडे, नाटळ, दिगवळे, नरडवे, सोनवडे या गावांच्या डोंगर भागांचा सर्व्हे करण्यात आला होता. या गावांतील डोंगर भागांपासून नजीक असलेल्या ग्रामस्थांना त्यावेळी नोटिसा काढण्यात आल्या होत्या. या नोटिसांमध्ये येथील ग्रामस्थांनी त्वरित आपापल्या घरांचा विमा उतरविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, ग्रामस्थांच्या जीविताच्या सुरक्षिततेसंबंधी यात काहीही उल्लेख नव्हता. त्यावेळी तत्काळ शासनस्तरावर डोंगर भागांचा सर्व्हे करण्यात आला; परंतु त्याचा अहवाल मात्र अद्याप आलेला नसल्याचे चौकशी अंती समजते.

कळंबा धरणाचे पाणी हे येथे कित्येक वर्षे मुरत असल्याने माती ढिली होऊन हे डोंगराचे भाग भविष्यात कोसळणारच आहेत. आम्ही जंगल भागात फिरत असताना बऱ्याच ठिकाणी भूस्खलन झाल्याचे पाहिले आहे. भविष्यात हे धोकादायक आहे. -गोपाळ सावंत, निसर्गप्रेमी

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग