शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला, माहेरी आली, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:00 IST

न्हावेली येथील विहिरीत आढळला मृतदेह 

सावंतवाडी : दोन महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या मळेवाड येथील अक्षरा अक्षय नाईक (२६) या विवाहितेने आपल्या माहेरी न्हावेली येथे घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. तिने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले? हे मात्र कळू शकले नाही. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून अक्षरा ही सोमवारीच माहेरी आली होती.दरम्यान, सावंतवाडी तालुक्यात आत्महत्येच्या वाढत्या घटना या चिंतेचा विषय बनला आहे. मागील दहा दिवसात पाच जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असून सध्या प्रबोधनाची गरज बनली आहे.मळेवाड येथील नवविवाहितेने माहेरी न्हावेली येथे विहिरीत उडी घेऊन अक्षरा अक्षय नाईक या विवाहितेने आत्महत्या केली. ती दोन महिन्यांपूर्वीच मळेवाड येथील अक्षय नाईक यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. अक्षराचे माहेरचे नाव प्रतीक्षा परब होते. अक्षरा ही सोमवारी दुपारी आपल्या माहेरी न्हावेली येथे आली होती. दरम्यान, घरातील सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेले असल्याने ती घरी एकटीच होती.सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर अक्षरा दिसली नाही, त्यामुळे त्यांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नाही. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह घराशेजारील विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच न्हावेली पोलिस पाटील सावळाराम न्हावेलकर, उपसरपंच अक्षय पार्सेकर आणि ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आणि उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अक्षराचा तळवडे येथे टेलरिंगचा व्यवसाय होता. विशेषतः दशावतार नाट्य कलाकारांचे दशावतारी कपडे शिवण्यात तिचा मोठा हातखंडा होता. तिचा दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. पण अवघ्या दोन महिन्यात तिने असे का टोकाचे पाऊल उचलले हे मात्र कळू शकले नाही. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून येथील कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन केले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत.