शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Sindhudurg: भुईबावडा घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 12:09 IST

पावसाचा जोर वाढल्याने खबरदारीचे आवाहन

वैभववाडी : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात शुक्रवार, २१ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. दरडीचा काही भाग रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, तालुक्यात सायंकाळी पावसाचा जोर किंचित वाढला आहे.मुसळधार पावसाने गुरुवारी तालुक्याला झोडपून काढले. या पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार झाले. कुसूर येथे झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शुक्रवारी सकाळपासून तालुक्यात तुरळक हलक्या स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. दुपारनंतर भुईबावडा आणि करुळ घाट परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली. दरडीचा काही भाग रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, दरडीमुळे वाहतूक ठप्प झालेली नाही. एकेरी वाहतूक सुरू आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दरड हटविण्यात आली नव्हती. सायंकाळी पावसाचा जोर वाढला, त्यामुळे घाटमार्गाने प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlandslidesभूस्खलनRainपाऊस