शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना! तारकर्ली येथे २० पर्यटकांनी भरलेली बोट उलटली, दोघेजण बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 17:13 IST

Boat Drown in Tarkarli : या सर्वांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग : देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे  बोट समुद्रात उलटून अपघात झाला आहे. जय गजानन नावाच्या या बोटीत तब्बल २० पर्यटक होते. त्यातील दोघे पर्यटक बुडल्याची माहिती मिळत असून काही  पर्यटक गंभीर जखमी आहेत. या सर्वांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे.

या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. स्थानिक पोलीस अधिकारी तसेच महसूलची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून याबाबतची माहिती जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना ही देण्यात आली आहे. काही वेळातच माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्वतः मालवण येथे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही गंभीर जखमींना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात ही हलविण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा- ग्रामीण रूग्णालय, मालवण यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे जय गजानन नावाची पर्यटकांना घेवून जाणारी बोट आज दुपारी 12.30 वाजता चे दरम्यान MTDC रिसॉर्ट, मालवण येथे बोट किनाऱ्यावर आणत असताना बुडाली. या बोटीत 20 पर्यटक होते.  त्यापैकी 2 पर्यटक मृत झाल्याची माहिती ग्रामीण रूग्णालय मालवण यांचेकडून प्राप्त झालेली आहे. उर्वरीत 18 पर्यटक तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत. सद्यःस्थितीत बोटितील सर्व पर्यटक सापडले असून बेपत्ता पर्यटकांची संख्या शून्य आहे. अशी माहिती पोलीस पाटील देवबाग यांचेकडून मिळालेली आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसtourismपर्यटन