कूळ कायद्याखालील ९७० दावे निकाली; १३४७ अजूनही प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2015 01:25 IST2015-06-03T01:19:12+5:302015-06-03T01:25:32+5:30

शेतकऱ्यांच्या वाट्याला न्याय : न्यायिक कारवाईमुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचा कयास ..

9 70 claims under the Descent Act extracted; 1347 still pending | कूळ कायद्याखालील ९७० दावे निकाली; १३४७ अजूनही प्रलंबित

कूळ कायद्याखालील ९७० दावे निकाली; १३४७ अजूनही प्रलंबित

.रत्नागिरी : कूळ कायद्याखाली विविध कलमांतर्गत दाखल झालेल्या जिल्ह्यातील एकूण २४०२ दाव्यांपैकी मार्च १५ अखेर ९७० दावे निकाली काढण्यात आले आहेत. तरी अजुनही १३४७ दावे अद्यापही अनिर्णित आहेत. या दाव्यांमध्ये जमिनीला कूळ लावणे तसेच कूळ हक्काची किंमत निश्चित करण्याचे प्रकरण हे दावे अतिशय क्लिष्ट असतात. तसेच यावर न्यायिक कारवाई होत असल्याने हे दावे वर्षानुवर्षे प्रलंबित रहात आहेत.
कूळकायद्याअंतर्गत विविध कलमांखाली कूळ वहिवाट शाखेकडे दाखल झालेल्या दाव्यांमध्ये जमिनीला कूळ लावणे (७०ब), दिवाणी कोर्टाकडून तहसीलदारांकडे आलेले संदर्भ (८५अ), कूळकायद्याच्या भंग झालेल्या प्रकरणान्वये सरकारजमा करणसंदर्भातील कारवाई (८४क), घरभाट विक्री प्रकरण (१७ब), कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची खरेदी किंमत निश्चित करणे (३२ ते ३२र) या प्रमुख पाच प्रकारच्या दाव्यांचा समावेश होतो.
एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत (७०ब) कलमांखाली एकूण ५४५ प्रकरणे दाखल झाली त्यापैकी १५ निकाली काढण्यात आली. (८५अ) कलमांखाली एकूण ४ प्रकरणे दाखल झाली त्यापैकी एकही निकाली काढण्यात आलेली नाही. (८४क) कलमांखाली एकच प्रकरण दाखल झाले असून ते अद्याप प्रलंबित आहे. (१७ब) कलमांखाली एकूण २६ प्रकरणे दाखल झाली त्यापैकी १ दावा निकाली काढण्यात आला. (३२ ते ३२र) कलमांखाली एकूण ७०९ प्रकरणे दाखल झाली त्यापैकी केवळ ९४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. मागील १०३२ प्रकरणे शिल्लक असल्याने मार्चअखेर यापैकी एकूण ९७० दावे निकाली काढण्यात आले असून अद्याप १३४७ दावे अजुनही प्रलंबित आहेत.
कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची खरेदी किंमत निश्चित करणे (३२ ते ३२र), जमिनीला कूळ लावणे (७०ब) हे दावे अतिशय क्लीष्ट असल्याने न्यायिक कारवाईत वेळ जातो. दाव्यांमध्ये तहसील न्यायालय हे बेसिक न्यायालय असते. हे दावे वर्षानुवर्षे प्रलंबित रहातात. दोन दाव्यांच्या प्रकरणांची संख्या जास्त आहे. रत्नागिरी. राजापूरात दाव्यांची संख्या सर्वाधिक आहे. (प्रतिनिधी)


तालुकामागीलनव्याने दाखल झालेले विविध दावे दावे
३२ ते ३२र१७ब७०ब८५अ८४कएकूणनिकालीशिल्लक
मंडणगड१९३००१२००६१२९३२
दापोली७८५२०८९००२१९११९१००
खेड६५६९०४८१०१८३११८६५
चिपळूण४१ ३७०४६१०१२५४०८५
गुहागर२३ ४७१०२५१०१०६३४७२
संगमेश्वर६२८९१३९०११९२७८११४
रत्नागिरी४५०१८३८१५५००७९६३१३४८३
लांजा८४१७०४५००१४६३८ १०८
राजापूर २१०१८५७८६१०४८९२०१२८८
एकूण १०३२७०९२६५४५४१२३१७९७०१३४७



२०११ साली प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली होती. यात सुमारे १२०० दावे एकाच वर्षात निकाली काढण्यात आले होते. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमुळेही हे दावे प्रलंबित राहिले. जिल्हा प्रशासनाने पुन्हा अशी मोहीम राबविल्यास हे दावे अधिकाधीक निकाली काढता येतील असा विश्वास जिल्हा प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात येत ्आहे. कोकणात असे अनेक दावे प्रलंबित असल्याचे प्रकार वाढत असले तरी ते सुटतील.

Web Title: 9 70 claims under the Descent Act extracted; 1347 still pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.