‘लोकमत’चा उद्या आठवा वर्धापन दिन
By Admin | Updated: January 14, 2015 00:42 IST2015-01-13T23:58:36+5:302015-01-14T00:42:46+5:30
उपक्रम विषयांवरील पुरवण्यासह नि:पक्षपातीपणे आणि निर्भिडपणे जनतेच्या समस्या ‘लोकमत’ने मांडल्या आहेत.

‘लोकमत’चा उद्या आठवा वर्धापन दिन
रत्नागिरी : वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली आठ वर्षे अग्र क्रमांकावर राहिलेल्या ‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा आठवा वर्धापन दिन गुरूवारी, १५ रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त वाचक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या आठ वर्षांत ‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीतून सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आदी विषयांवर सतत विविधांगी लेखन झाले आहे. उपक्रम विषयांवरील पुरवण्यासह नि:पक्षपातीपणे आणि निर्भिडपणे जनतेच्या समस्या ‘लोकमत’ने मांडल्या आहेत. अनेक गरजूंच्या समस्या सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने काही वर्षातच सामान्य वाचकांच्या मनात आपुलकी निर्माण केली आहे.विविध विषयांवर तज्ज्ञांच्या परिचर्चा, स्टिंग आॅपरेशन, विविध समाजोपयोगी उपक्रम ‘लोकमत’ने वेळोवेळी राबविले आहेत. यावेळी आठव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गुरूवार, १५ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळच्या सत्रात ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या कृषी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, शेती-बागायतीमध्ये विविध प्रयोग केलेले शेतकरी यांचे अनुभव या विशेषांकातून वाचकांसमोर ठेवण्यात येत आहेत.या स्नेहमेळाव्याला अधिकाधिक वाचक, हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विजय पोवार, वरिष्ठ शाखाधिकारी अतुल कामत, आवृत्तीप्रमुख मनोज मुळ्ये यांनी केले आहे. (प्रतिनिधी)