८२ टक्के लोकांचा ‘आधार’ नक्की

By Admin | Updated: December 30, 2014 23:32 IST2014-12-30T21:40:19+5:302014-12-30T23:32:33+5:30

नागरिकांची पळापळ : सर्वच सरकारी कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य होणार!

82 percent of people are 'bases' | ८२ टक्के लोकांचा ‘आधार’ नक्की

८२ टक्के लोकांचा ‘आधार’ नक्की

रत्नागिरी : शासन आता सर्वच कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आधारकार्ड काढली नाहीत किंवा ज्यांची अद्याप मिळाली नाहीत, अशांची पुन्हा आधार नोंदणी केंद्राकडे पळापळ सुरू झाली आहे. ग्लोडाईननंतर आता स्पॅन्को कंपनीने आधारकार्डचे काम घेतले असून, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३,३२,९२६ (८२.६५ टक्के) इतक्या आधारकार्डचे काम झाले आहे.
राज्यातील आधारकार्डचे काम करण्यासाठी शासनाने ग्लोडाईन या कंपनीकडे काम दिले होते. पण, पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्याचे केवळ ३५ टक्के काम झाल्यानंतर या कंपनीने काम अचानक सोडून दिले. १२ जानेवारी २०११ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत जिल्ह्यातील १६,१२,६७२ लोकसंख्येपैकी केवळ ६,४३,५८२ एवढ्याच आधारकार्डचे काम झाले होते. त्यानंतर विविध शिष्यवृत्ती, विविध योजनांचे अनुदान, गॅस सिलिंडरची सबसिडी आदींसाठीही आधारकार्ड सक्तीचे केल्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली.
जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारकडून आधारकार्ड नोंदणीची ४५ मशिन्स प्राप्त झाली होती. पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील काम स्पॅन्को कंपनीला दिले. तसेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या आधारकार्ड मशिन्सपैकी १७ मशिन्स जिल्ह्यातील १७ अधिकृत गॅस एजन्सीधारकांना त्यांच्या ग्राहकांना आधारकार्ड सुविधा मिळावी म्हणून दिले.
तसेच सर्व तहसील कार्यालयाकडेही प्रत्येकी एक मशीन देण्यात आले. १ जानेवारी २०१३ पासून जिल्ह्यात स्पॅन्को कंपनीतर्फे आधार कार्ड नोंदणीला सुरूवात झाली. स्पॅन्को कंपनीने २५ फेब्रुवारी २०१३ ते ३० डिसेंबर २०१४ अखेर पूर्ण केलेली तसेच गॅस एजन्सी, प्रशासन यांच्या माध्यमातून आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील १३,३०,०६८ इतक्या आधारकार्डचे काम झाले आहे. त्यामुळे आता उर्वरित १७.३५ टक्के आधारकार्डचेही काम लवकरच पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास स्पॅन्को कंपनीचे चंद्रकांत कदम यांनी विश्वास व्यक्त केला.
सध्या जिल्ह्यात ३१ महा - ई सेवा केंद्रांतर्फे आधारकार्डचे काम सुरू आहे. ज्यांनी अजूनही आधारकार्ड काढली नाहीत वा ज्यांची अद्याप मिळालेली नाहीत, त्यांनी आधारकार्ड काढून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)

१३ लाख कार्डाचे काम पूर्ण

तालुकापहिला डिसे.१४
टप्पाअखेर
मंडणगड४२,३११३७०७५३दापोली६२,१७८१७५६४६
खेड८१,८१६१६३७०६
चिपळूण९९,९३११६३००२
गुहागर७१,३२४१११७७६
संगमेश्वर१,०३,१२९११०४२५
रत्नागिरी१,२९,४४२१०४९३३
लांजा४५,६६१९४४६५
राजापूर ५९,६७३३८२१९
एकूण६,९५,४६५१३,३२,९२६

जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारकडून आधारकार्ड नोंदणीची ४५ मशिन्स प्राप्त.
स्पॅन्को कंपनीने २५ फेब्रुवारी २०१३ ते ३० डिसेंबर २०१४ अखेर पूर्ण केलेली तसेच गॅस एजन्सी, प्रशासनव्दारे १३,३०,०६८ आधारकार्डचे काम पूर्ण.

Web Title: 82 percent of people are 'bases'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.