शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी 'उजळली' केगदवाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 22:20 IST

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल 71 वर्षे अंधारात चाचपडणारी करुळ केगदवाडी महावितरणच्या प्रकाशाने उजळून निघाली.

 वैभववाडी - स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल 71 वर्षे अंधारात चाचपडणारी करुळ केगदवाडी महावितरणच्या प्रकाशाने उजळून निघाली. बारा कुटुंबाच्या धनगरवस्तीवरील वीज, रस्ता व पाण्याच्या समस्येचे भयाण वास्तव अडीच वर्षांपुर्वी 'लोकमत'ने मांडल्यानंतर अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला गती येऊन मागील पाच पिढ्यांपासून केगदवाडीवासियांसाठी स्वप्नवत असलेला वीजपुरवठा अखेर बुधवारी सुरु झाला. त्यामुळे केगदवाडीच्या रहिवाशांना अक्षरशः आकाश ठेंगणे झाले.

      एका बाजूला करुळ घाट आणि उर्वरित तिन्ही बाजूंनी वनखात्याच्या जंगलाचा वेढा पडल्याने केगदवाडीच्या पाच पिढ्या वीज, रस्ता व पाण्यासाठी संघर्ष करण्यात गेल्या. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत, स्थानिक लोकप्रतिनिधी व रहिवाशांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. मात्र, वनखात्याच्या जागेवर येऊन अडणारं घोडं पुढे सरकण्याचं नाव घेत नव्हते. त्यामुळे केगदवाडीचे भयाण वास्तव 22 नोव्हेंबर 2015 ला 'लोकमत'ने ठळकपणे मांडून कित्येक वर्षांच्या पाठपुराव्याला बळ दिले. त्यानंतरच ख-या अर्थाने  केगदवाडीच्या वीजेचा प्रश्न ऐरणीवर येऊन त्याला गती मिळाली. त्यानंतर आमदार नीतेश राणे व खासदार विनायक राऊत यांनीही या गंभीर समस्येचा शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यामुळे गेल्या डिसेंबरमध्ये वनखात्याची ना हरकत मिळून केगदवाडीच्या वीजवाहीन्यांचे काम सुरु झाले होते.

     वनखात्याला लागणा-या कागदपत्रांची पुर्तता करुन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस बी लोथे यांनी दाखविलेली सकारात्मकता दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे अखेर करुळ केगदवाडीच्या वीज सेवेचा विषय मार्गी लागून उपवनसंरक्षक समाधान चव्हाण व पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे यांनी केगदवाडी येथील वीज जनित्राची फित कापून उद्घाटन करीत बुधवारी सायंकाळी बहुप्रतिक्षित वीजपुरवठा सुरु केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील, सरपंच सरिता कदम, माजी सरपंच रमेश सुतार, वनक्षेत्रपाल स.बा.सोनवडे, वनपाल चंद्रकांत देशमुख, करुळ वनरक्षक संदीप पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत पाटील, संतोष बोडके, गजानन पाटील, राजेंद्र गुरखे, बापु गुरखे आदी उपस्थित होते.

     यावेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण म्हणाले की, सर्व यंत्रणा एकत्र आली की अशक्य काम कसे शक्य होते याचे केगदवाडीचा वीजपुरवठा हे उत्तम उदाहरण आहे. या वाडीचा वीज प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक विभागाने मेहनत घेतली. यामुळेच हा विषय मार्गी लागल्याचे स्पष्ट करीत वनविभागाबाबत समाजात जी नकारात्मक भुमिका आहे ती चुकीची आहे. वनविभाग काय सर्व विभाग शासन निर्णयाच्या अधिन राहून काम करतात. त्यामुळे कोणत्याही बाबीचा पाठपुरावा नियमात बसवून योग्य प्रकारे झाला तर कोणताही प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही हेही यानिमित्ताने सिध्द झाले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

 आजचा दिवस भाग्याचा: धोंडू गुरखे           आजचा दिवस भाग्याचा व आमच्यासाठी आनंदाचा आहे. आम्ही गेली कित्येक वर्ष अंधारात काढली. मात्र अखेर आज वाड्यावर लाईट आली याचा आनंद झाला. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी, गावक-यासह अनेकांचे सहकार्य लाभले. सर्वांच्या प्रयत्नांमुळे वीजेचा विषय सुटला. आता आमचा रस्त्याचाही प्रश्न मार्गी लागून खडतर जीवन सुसह्य व्हावे, एवढीच आमची मागणी आहे, भावुक उद्गार केगदवाडीचे रहिवाशी धोंडु गुरखे यांनी वस्तीचा वीज पुरवठा सुरु झाल्यावर व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीजnewsबातम्या