शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

डॉल्फिनला वाचविण्यासाठी ७१ शास्त्रज्ञ आले एकत्र, समोर अनेक आव्हाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 12:43 IST

पश्चिम हिंद महासागरात कॉन्झर्व्हेशन नेटवर्कद्वारे संवर्धनासाठी करणार प्रयत्न

संदीप बोडवेमालवण : पश्चिम हिंद महासागर क्षेत्रामधील १७ देशांतील ७१सागरी जीवशास्त्रज्ञ डॉल्फिनच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींना वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिन कॉन्झर्व्हेशन नेटवर्क (HuDoNet) या नावाने नेटवर्क तयार केले असून इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिनच्या संवर्धनासाठी ते काम करणार आहेत.दक्षिण आणि पूर्व आफ्रिका, पश्चिम आशिया, भारत आणि श्रीलंकेच्या टोकापर्यंत तसेच मादागास्कर आणि मेयोटसारख्या बेटांमधील हिंद महासागराच्या अरुंद पट्ट्यात इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिनचा अधिवास आढळतो. लहान गटाने वास्तव्य करणारे दुर्मीळ असे हंपबॅक डॉल्फिन फक्त उथळ पाण्यात आढळतात, सहसा किनाऱ्याच्या अगदी जवळ असतात.

अधिवास कमी होत चाललाय..कॉन्झर्व्हेशन नेटवर्कचे समन्वयक डॉ. शानन ॲटकिन्स म्हणाले, जास्त मानवी लोकसंख्या असलेल्या किनारपट्टीच्या जवळ या डॉल्फिनचा अधिवास कमी होत चालला आहे. सागरातील मानवी हस्तक्षेपामुळे डॉल्फिनचे अस्तित्व धोक्यात येत असून, ते समजणे आणि मोजणे आव्हानात्मक आहे.

समोर अनेक आव्हानेभारतातील हंपबॅक डॉल्फिनचा अभ्यास करणाऱ्या केतकी जोग म्हणतात, डॉल्फिन संशोधकांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. संशोधनाच्या दीर्घकाल चालणाऱ्या प्रयत्नांना टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक अभाव हेसुद्धा एक आमच्यासमोर मोठे आव्हान आहे.

अधिकाऱ्यांकडून कारवाईचा अभावदक्षिण आफ्रिकेतील साशा डायन्स म्हणतात, आमच्याकडे संशोधनासाठी लागणारी उपकरणे, कर्मचारी आणि निधी मर्यादित आहे. या श्रेणीतील डॉल्फिनचा पूर्व अभ्यास, तांत्रिक समर्थन आणि उपायांचा तसेच या प्रजातीबद्दल जागरूकता नसणे आणि अधिकाऱ्यांकडून कारवाईचा अभाव आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्गResearchसंशोधन