शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सिंधुदुर्ग  : चांदा ते बांदा अंतर्गत ६७ कोटींचा निधी प्राप्त : अजित गोगटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 12:31 IST

चांदा ते बांदा या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १०० कोटींपैकी ६७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता संबंधित लाभार्थ्याने जामसंडे येथील भाजपा कार्यालयाशी संपर्क साधावा.

ठळक मुद्देचांदा ते बांदा अंतर्गत ६७ कोटींचा निधी प्राप्त : अजित गोगटे विविध योजनांच्या लाभासाठी भाजपा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

देवगड : चांदा ते बांदा या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १०० कोटींपैकी ६७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता संबंधित लाभार्थ्याने जामसंडे येथील भाजपा कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेंतर्गत जलसंधारण विभागामार्फत देवगड तालुक्यातील चिरेखाणीमध्ये पायलट प्रोजेक्ट राबवावा अशी मागणी करणार असल्याची माहिती चांदा ते बांदा जिल्हास्तरीय समितीचे सदस्य अ‍ॅड. अजित गोगटे यांनी दिली.जामसंडे येथील भाजपा कार्यालयात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर उपस्थित होते.यावेळी बोलताना गोगटे म्हणाले की, २०१५ साली चांदा ते बांदा योजनेचा निर्णय होऊन २०१६ साली या योजनेला मंजुरी मिळाली. यात चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या जिल्ह्यांतील निसर्ग संपत्तीवर आधारित पायलट प्रोजेक्ट करून या जिल्ह्यांचा विकास करावा या उद्देशाने योजनेची सुरुवात झाली.प्रामुख्याने हे दोन्ही जिल्हे अर्थमंत्री व अर्थ राज्यमंत्री यांचे असल्याने या जिल्ह्यांचा विकास विविध योजनेतून करण्याकरिता १०० कोटी रुपयांचा निधी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला ६७ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे.याचबरोबर या योजनेमध्ये पर्यटनाकरिता ३५ कोटींचा निधी मंजूर असून त्यापैकी २१ कोटी रुपये मान्य झाले आहेत. यात नापणे, सावडाव धबधब्यांकरिता १ कोटी ८५ लाख तसेच वॉटर स्पोर्टस्, केरळ-अलपै निवास न्याहारी, पर्यटन सुविधा, खाडीपात्रातील गाळ उपसा करणे व त्यामध्ये पर्यटन बोटी यांचा समावेश असून देवगड तालुक्यात असे उपक्रम राबविण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा.कृषी क्षेत्राकरिता २५ कोटींपैकी ११.२० लाख रुपये उपलब्ध आहेत. यामध्ये भात लागवड, दुबार पिके, जुनाट आम्रवृक्षाचे पुनरूज्जीवन, काजू उत्पादन वाढविणे, आवश्यक ती शेती अवजारे, कोकम, जांभूळ, फणस लागवड याकरिता कृषी विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

यात ५० लाख रुपये एवढा निधी उपलब्ध असून ३५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. प्रामुख्याने बेबी स्वीट कॉर्न प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याबरोबरच जलसंधारण व कृषी विभागामार्फत १९ कोटी २० लाख रुपये प्राप्त असून यात वळणबंधारे व अन्य बंधाºयांची मागणी करण्यात येऊ शकते.पशुसंवर्धन विभागाकरिता शेळीपालन व अन्य व्यवसायांकरिता २ कोटी ५२ लाख रुपये व मत्स्य व्यवसाय, खेकडा पालन याकरिता ८० लाख रुपये, छोट्या मच्छिमारांना फ्रिज ८ लाख रुपये, जेटीवर सोलर दिवे ४२ लाख रुपये याचबरोबरच जेटी दुरुस्तीकरिता २ कोटी ४४ लाख रुपये प्राप्त असून मत्स्य व्यवसाय यांत्रिकीकरणांतर्गत छोट्या होडीव्दारे मच्छिमारांना इंजिन पुरविणे यासाठी या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच लघुउद्योग, लाकडी खेळणी यासाठीदेखील प्रत्येकी ७० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तरी चांदा ते बांदा या योजनेंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता संबंधित विभागाकडे लाभार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी भाजपा कार्यालय देवगड येथे संपर्क साधावा, असे आवाहन अ‍ॅड. अजित गोगटे यांनी केले आहे.मधुमक्षिकामध्ये समावेशाची मागणीजिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असून त्यांच्यासमवेत जिल्ह्यातील प्रमुख क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी समितीचे सदस्य म्हणून निवडण्यात आली आहेत. त्यात आपली निवड करण्यात आली असल्याचे अजित गोगटे यांनी सांगितले.या योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या विविध विभागांची माहिती घेतली असता खादी ग्रामोद्योगअंतर्गत पाच कोटीपैकी दोन कोटी चाळीस लाख रुपये प्राप्त झाले असून यात निरा प्रकल्प व मधुमक्षिका पालन यांचा समावेश आहे.देवगड तालुक्यात आंबा बागायतीवर कीटकनाशकांची फवारणी होत असल्याने मधुमक्षिका पालनाकरिता देवगड तालुक्याचा समावेश नसल्याचे दिसून आले. परंतु अशा व्यवसायास देवगड तालुक्यात अन्य ठिकाणी निश्चितच प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे मधुमक्षिका पालनाकरिता देवगड तालुक्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्गfundsनिधी