महादेव भिसेआंबोली : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली पोलिस तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा कंटेनर क्रमांक (टी.एन-७२-सीबी-७५०३) पोलिसांनी ताब्यात घेतला.हा आयशर ट्रक गोव्यावरून तामिळनाडू येथे अवैध दारू वाहतूक करत होता. ही गाडी आंबोली पोलिस तपासणी नाक्यावर तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी हौदा खोलून पाहिले असता त्यामध्ये गोवा बनावटीचे तब्बल ७०० बॉक्स दारू आढळून आली.तात्काळ आंबोली पोलिस स्थानकावरील दत्तात्रय देसाई व सहकाऱ्यांनी तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तैनात असलेले एसएसटीचे कर्मचारी यांनी गाडी ताब्यात घेतली व गुन्हे दाखल केले. यावेळी गाडीसह तब्बल ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Sindhudurg: आंबोलीमध्ये अवैध दारूसह ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 24, 2024 18:15 IST