शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना ५० खोके अन् लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे; अमोल कोल्हेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

By अनंत खं.जाधव | Updated: October 5, 2024 16:25 IST

आमदार दमदार हवा, गद्दार नको; अमोल कोल्हे यांचे मंत्री केसरकरांवर टीकास्त्र

सावंतवाडी : प्रत्येक मतदाराला आपल्या आमदारांची कामगिरी दमदार व्हावी असेच वाटत असते. पण आपला आमदार दमदार नसून तो गद्दार आहे जनतेला कळून चुकले आहे. आमदारांना ५० खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रूपये हे कसे काय? असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार टाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. येथील आमदारांची जादू आता चालणार नाही. 'आता बदल हवो तर आमदार नवो' म्हणत जनतेला साद घालत, काम करणाऱ्याला निवडून पाठवा असे आवाहन कोल्हे यांनी यावेळी केले.शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडीत आलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला तसेच अर्चना घारे-परब यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी कोल्हे म्हणाले, मंत्री केसरकर यांची अवस्था जादुगारा सारखी झाली आहे. पण आता ही जादू चालणार नाही. ..त्यामुळेच मालवणमधील पुतळा पडलामहाराष्ट्रात एक फुल्ल दोन हाफ आहेत. त्यांनी महाराजांचे विचार सोडले त्यामुळेच मालवणमधील पुतळा पडला. या सरकारने सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार केला असून त्यातून महाराजांना ही सोडले नाही. असा आरोप करत यांनी पन्नास खोके घेतले आणि लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रूपये देता. मुलांना गणवेश मिळत नाही. दोन वर्षे तोच गणवेश घालतात यावरून येथील शिक्षण मंत्र्यांनी बोध घ्यावा. हवेतील बाता करू नये. लाडका कॉन्ट्रकटर कुठे आहे. मुलांना गणवेश कधी मिळणार कि हे सर्व सावंतवाडीतील विकास कामासारखे आहे असा सवालही कोल्हे यांनी केला. त्यामुळेच आता जनतेला बदल हवो तर आमदार नवो असे म्हणत केसरकरांची खिल्ली उडवली.आमदार दमदार हवा, गद्दार नको जनतेला कळून चुकले आहे की त्याच त्या घोषणा ऐकून जनता कंटाळली आहे. त्यामुळेच येथे बदल घडवण्याचे काम सावंतवाडीतील जनतेचे आहे. आमदार दमदार हवा पण गद्दार नको त्यामुळे गद्दारांना धडा शिकवा असे आवाहनही कोल्हे यांनी केले. यावेळी प्रसाद रेगे, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, विशाल जाधव, सावली पाटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर,  पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, काशीनाथ दुभाषी, विवेक गवस, हिदायतुल्ला खान, रवींद्र चव्हाण, सायली दुभाषी, समीर आचरेकर, देवेंद्र पिळणकर, सुनीता भाईप, ऋत्विक परब नवल साटेलकर उपस्थित होते'जॅकेटवाला जादूगार बदलूया'सावंतवाडीत एक खराखुरा जादूगार आला आहे. तर दुसरीकडे जॅकेटवाला जादूगार आहे. या जॅकेटवाला जादूगार लोकांना आपली जादू दाखवतो. पण लोकांच्या हातांना काम नाही तर ही जादू काय कामाची आता या जॅकेटवाला जादूगार बदलूया आणि अर्चना घारे-परब ना निवडणून आणूया असेही कोल्हे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेMahayutiमहायुतीDeepak Kesarkarदीपक केसरकर