शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: देवगड-जामसंडे ५ जणींना १२ लाखांना गंडा, महिला ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:26 IST

देवगड : दर महिना उत्तम परतावा देणारी स्कीम असल्याचे आमिष दाखवून देवगड-जामसंडे शहरातील पाच महिलांची १२ लाख ७२ हजार ...

देवगड : दर महिना उत्तम परतावा देणारी स्कीम असल्याचे आमिष दाखवून देवगड-जामसंडे शहरातील पाच महिलांची १२ लाख ७२ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देवगड पवनचक्की येथील श्रद्धा प्रकाश मोंडकर उर्फ आकांक्षा अतुल धुरी (३६) या संशयित महिलेविरुद्ध देवगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महिलेला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित श्रद्धा मोंडकर हिने २२ सप्टेंबर २०२३ ते ५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत देवगड जामसंडे शहरातील पाच महिलांची सुमारे १२ लाख ७२ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात प्रशांत राऊत यांनी तक्रार दिली. या तक्रारीमध्ये मोंडकर हिने २२ सप्टेंबर २०२३ ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजी या कालावधीत देवगड जामसंडेमधील एकूण पाच महिलांकडून उत्तम परतावा देणारी स्कीम असल्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटकरिता रक्कम घेतली. ही रक्कम एकूण १२ लाख ७२ हजार ४०० रुपये असून पाचही महिलांनी तिच्याकडे एजंट म्हणून सोपविलेल्या रकमेची मागणी केली. मात्र त्यांना वेगवेगळ्या सबबी सांगून दिलेली रक्कम देण्याचे टाळले. तसेच मूळ मुद्दल व व्याजही परत न करता आर्थिक फसवणूक केली, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.या तक्रारीवरून पोलिसांनी श्रद्धा प्रकाश मोंडकर हिच्याविरुद्ध भादंवि कलम ४०९, ४०६, ४२० व महाठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. संशयित महिलेला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत.