जिल्ह्यात साडेपाच लाख रेशन कार्डांना ‘आधार’

By Admin | Updated: September 30, 2015 00:03 IST2015-09-29T21:36:02+5:302015-09-30T00:03:42+5:30

संगणकीकरण प्रकल्प : पुरवठा विभागाची विशेष मोहीम

5 thousand ration cards in the district | जिल्ह्यात साडेपाच लाख रेशन कार्डांना ‘आधार’

जिल्ह्यात साडेपाच लाख रेशन कार्डांना ‘आधार’


रत्नागिरी : शासनाच्या रेशनकार्ड संगणकीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रेशनकार्डला आधारकार्ड जोडण्याच्या कामाला जिल्ह्यात सुरुवात झाली असून, आतापर्यंत ५,६७,८३० लाभार्थींचे ‘लिंकिंग’ करण्यात आले आहे.
रेशनकार्ड संगणकीकरण प्रकल्पांतर्गत रेशनकार्डला आधारकार्ड जोडण्याच्या कामाला जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून, रेशन दुकानांमध्ये अर्ज उपलब्ध करून दिले होते. सुरुवातीला बहुतांश नागरिकांची आधारकार्ड नसल्याने या प्रक्रियेत अडचणी येत होत्या.
जिल्हा प्रशासनाकडून यासाठी ठराविक मुदत दिल्यानंतर ज्यांनी आधारकार्ड काढली नव्हती, त्यांची धावपळ सुरू झाली होती.
आधारकार्डसाठीही विशेष मोहीम राबविण्यात आल्याने बहुतांश आधारनोंदणी झाली आहे. त्यापैकी ज्यांना आधारक्रमांक (युआयडी) मिळाले आहेत, अशांकडून ही माहिती भरून घेण्यात आली असून, संगणकामध्येही ती भरण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ३,७४,३९७ शिधापत्रिकाधारक असून, एकूण लाभार्थी संख्या १७,०८,५१९ इतकी आहे.
या लाभार्थींपैकी ५,६७,८३० लाभार्थींचे आधारकार्ड रेशनकार्डशी लिंकिंग करण्यात आले आहे. त्यांची संपूर्ण माहिती संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यात आली आहे. आता या कामाने वेग घेतला आहे.लवकरच उर्वरित लाभार्थींची आधारकार्डही जोडली जातील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

मोहिमेच्या सुरूवातीला या प्रक्रियेसाठी ग्राहकांकडून भरून घ्यावयाचे रेशनदुकानदारांकडे ठेवण्यात आले होते. मात्र, त्याच कालावधीत रेशनदुकानदारांचा संप सुरू झाल्याने त्यांनी आपण ग्राहकांना अर्ज देऊ मात्र, भरलेले अर्ज परत घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे या मोहिमेत अडचण निर्माण झाली होती.
रेशनदुकानदारांनी भरलेले अर्ज संकलित करण्यास नकार दिल्याने प्रत्येक तहसील कार्यालयाकडून ही जबाबदार तलाठी व आशा वर्कर, पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांच्याकडून हे अर्ज संकलित करून ते पुरवठा विभागाकडे जमा करण्यात आले आहेत.
अनेक ग्राहकांनी आधारकार्ड काढून कित्येक महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप त्यांना आधारकार्ड मिळालेली नाहीत. तसेच आॅनलाईन प्रक्रियेत अडथळा येत असल्याने काहींना युआयडी क्रमांकही मिळालेला नाही. त्यामुळे कामाचा वेग मंदावत आहे. मात्र येत्या काही दिवसात हे कामही गती घेईल आणि जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थींची आधारकार्ड जोडली जातील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील एकूण लाभार्थी संख्या,
युआयडी संलग्न संख्या
तालुकालाभार्थी युआयडी
संख्यासंख्या
मंडणगड७३८५०१९०१७
दापोली१९५३०७७२५५१
खेड१८७३०५६८२९९
चिपळूण२८६५७६७४९६३
गुहागर१३२०१७३११२८
संगमेश्वर२२५३४६९१४३४
रत्नागिरी३१०४३२१२२२७३
लांजा१११९०७४७७७५
राजापूर१८५७७९४०३९०
एकूण१७०८५१९५६७८३०

Web Title: 5 thousand ration cards in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.