शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील ५ हजार शेतकऱ्यांना मोफत भरड धान्य वाटप करणार, अतुल काळसेकर यांची माहिती

By सुधीर राणे | Updated: June 22, 2023 17:01 IST

प्रोत्साहन अनुदान, खावटी कर्जमाफी लवकरच मिळणार

कणकवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. आपल्या जीवनात भरड धान्याचे फार महत्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील  ५ हजार शेतकऱ्यांना मोफत भरड धान्य वाटप करण्यात येणार आहे. भरड धान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,मनोज रावराणे, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे हेमंत सावंत, संदीप राणे, पंकज दळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.अतुल काळसेकर म्हणाले, सध्या पाऊस लांबणीवर पडला असल्याने भाताची दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे  भरड धान्य या शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचवू शकेल. त्यासाठी नाचणी १५०० किलो, वरी १५०० किलो, सावा, कांग, हरिक, बरड, ब्राऊन टॉप ५०० किलो असे बियाणे मोफत वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात आता अडीच लाख किलो हळद बियाणे उपलब्ध झाले आहे. कारण आम्ही आत्मनिर्भर उपक्रमांतर्गत अनेकांना हळद बियाणे  वाटप केले होते. तशाच प्रकारे भरड धान्य बँक तयार व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.प्रोत्साहन अनुदान, खावटी कर्जमाफी लवकरच मिळेल !यादीत नाव येऊनही अद्यापही प्रोत्साहन अनुदान जमा न झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच ते अनुदान मिळेल. तसेच खावटी कर्ज माफी संदर्भात आमचा पाठपुरावा पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सुरु असल्याची माहिती अतुल काळसेकर यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी