शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

सिंधुदुर्गातील पूरबाधित गावे जाहीर, कोणती अन् किती.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:17 IST

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात बऱ्याच वेळा अती मुसळधार पाऊस पडतो. परिणामी नदी, नाल्यांना पूर येऊन अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली ...

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात बऱ्याच वेळा अती मुसळधार पाऊस पडतो. परिणामी नदी, नाल्यांना पूर येऊन अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली जातात. ज्या भागात पूर येतो, अशी पूरबाधित गावे प्रशासनाने जाहीर केली आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांसह आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यात ४५ गावे पूर बाधित असून यात ५५७४ लोक बाधित होत आहेत.मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात पाणी शिरते, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. घरात, दुकानात, शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान जिल्हावासीयांना सहन करावे लागते.  ज्या भागात गावात पूर येतो अशी ४५ गावे प्रशासनाने निश्चित केली आहेत. यात सावंतवाडी तालुक्यातील ९ गावे ८३५ लोक, वेंगुर्ला तालुक्यातील ७ गावे ७८२ लोक,कुडाळ तालुक्यातील ५ गावे ६३२ लोक, मालवण तालुक्यातील ६ गावे १५०५ लोक, कणकवली तालुक्यातील ६ गावे ४८० लोक, देवगड तालुक्यात ५ गावे ३४० लोक आणि वैभववाडी तालुक्यातील ७ गावे आणि १००० बाधित लोकसंख्या आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून उपाययोजनांसह आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

पूरबाधित गावेसावंतवाडी - इन्सुली, बांदा,  शेर्ले, तळवडे, आरोंदा, किनळे, कवठी, सातार्डा, सातोसे, वेंगुर्ला - केळुस, कालवी, होडावडा, परबवाडी, सुभाषवाडी, कर्ली, चिपी, कुडाळ - कुडाळ, पावशी, बाव, चेंदवण, सरंबळ, मालवण - मसुरे, मर्डे, बांदिवडे बुद्रुक, मळगाव, बागायत, चिंदर अपराजवाडी, कणकवली-खारेपाटण बाजारपेठ, बंदरगाव, कलमठ, वरवडे, फणसनगर, जानवली, देवगड-मणचे, मालपेवाडी, मुस्लिमवाडी, धालवली मुस्लिमवाडी, कोर्ले, अमिडी बर्ड, कुसूर, नापणे, कोकिसरे, नाथवडे, एडगाव-इनामदारवाडी, सोनुर्ली 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfloodपूर