शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय भात खरेदी विक्रीसाठी ४१ नोंदणी केंद्रे सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 18:17 IST

धान (भात) खरेदी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी करण्यात येणार

सिंधुदुर्ग : धान विक्री शेतकऱ्यांनी हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करणार आहे, त्यांनी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात यावी, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी, ए. एस. देसाई यांनी दिली.जिल्ह्यात ४१ ठिकाणी धान (भात) विक्री नोंदणी केंद्रे सुरु करण्यात आली असून, यापूर्वी नोंदणीसाठी शुक्रवार दि. २१ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि धान विक्री नोंदणीसाठी शेतकऱ्यांना पुन:श्च गुरुवार दि. १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य शासनाच्या आधारभूत किंमत धान खरेदी योजनेसाठी दि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लि. ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता म्हणून ही संस्था खरेदीचे काम पाहत आहे.सन २०२२-२३ मध्ये शासनाच्या सूचनेनुसार खरीप पणन हंगामासाठी शासनाचे एफ. ए. क्यु प्रतीच्या धान (भात) करिता २ हजार ४० प्रती क्विंटल दर जाहीर करण्यात आला आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) विक्री करावयाची आहे. अशा शेतकऱ्यांना नोंदणीकरिता शासनाकडून पुन:श्च गुरुवार दि. १० नोंव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.याबाबत शेतकऱ्यांनी सातबारा मिळण्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय, तालुका खरेदी विक्री संघ, जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन दि- महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने केली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर खरेदीची रक्कमधान (भात) खरेदी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने  प्रत्येक केंद्राकरिता स्वतंत्र आयडी तयार करुन संस्थांना दिलेला आहे. नोंदणीसाठी चालू खरीप हंगाम सन २०२२-२३ मधील धान (भात) पीक लागवडीची नोंद असलेला डिजिटल स्वाक्षरीचा मूळ सातबारा प्रत, आधारकार्ड व बँक पासबुकाची झेरॉक्सप्रत इत्यादीची कागदपत्रांची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एस.एम.एस.व्दारे नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे. भविष्यात शासनाकडून धान (भात) खरेदीच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एस.एम.एस. व्दारे खरेदीसाठी बोलविण्यात येईल.

जिल्ह्यात अशी आहेत ४१ केंद्रेयासाठी पुढीलप्रमाणे तालुकावार नोंदणी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. सावंतवाडी तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, मडुरा, डेगवे, कोलगाव, इंन्सुली, तळवडे, भेडशी.  कुडाळ तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत कुडाळ, कसाल, माणगाव, घोडगे,निवजे, आंब्रड, पिंगुळी, पणदूर, कडावल, तुळस, वेताळबांबार्डे, गोटोस, निरुखे. कणकवली तालुका- शेतकरी तालुका खरेदी विक्री संघ लि. कणकवली मार्फत कणकवली, लोरे नं.1, फोंडा, घोणसरी, सांगवे. वेंगुर्ला तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत वेंगुर्ला व होडावडा. देवगड तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत देवगड, पडेल, पाटगाव. मालवण तालुका- खेरदी विक्री संघ लि. मार्फत पेंडूर, गोठणे, विरण, मालवण. वैभववाडी तालुका- खरेदी विक्र संघ लि. मार्फत वैभववाडी, करुळ. आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सह. संघ लि. मार्फत ओरोस, कट्टा,मसुरे  अशा एकूण ४१ केंद्रावर नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग