शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

बांद्यात 40 ते 50 माणसे घरामध्ये अडकली, बाजारपेठेसह घरे पाण्याखाली            

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 15:45 IST

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक गाव संपर्कहीन झाली आहेत.

सावंतवाडी : संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक गाव संपर्कहीन झाली आहेत. सावंतवाडी तालुक्‍यातील बांदा शहरातील काही घरे पाण्याखाली गेली आहेत. शहरातील अनेक दुकानात पाणी शिरले आहे तर  महामार्ग नजीकच्या घरांमध्ये पाणी घुसले असून, अनेकांनी आपले कुटुंब मध्यरात्रीच स्थलातंर केले असले तरी बांदा गवळीटेब येथील लक्ष्मी विष्णू संकुलात तब्बल 30 ते 40 ग्रामस्थ अडकले होते. त्यांना अल्मेडा यांच्या टीमने बाहेर काढले उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता, तसेच पाण्याची पातळी ही वाढत होती, त्यामुळे ग्रामस्थामध्ये मध्ये घबराट होती. गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यातच सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे होडावडे पुलपाण्याखाली गेला आहे. ओटवणे असनिये भागात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं अनेक गावे जलमय झाली आहेत. मुसळधार पावसाचा जोरदार फटका बांदा इन्सुली शेर्ले या गावांना बसला आहे.बांदा बाजारपेठ तर पूर्णता पाण्याखाली गेली असून जवळपास 100 दुकानांमध्ये पाणी घुसले आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने दुकानांमधील संपूर्ण सामान पाण्याखाली गेले आहे. एसटी स्टँड परिसर पूर्णता पाण्यात असून बांद्याचे जुने फुल ही पाण्याखाली गेले आहे. झाराप पत्रादेवी महामार्गाजवळ असलेल्या बांदा व शेर्ले येथील घरे पूर्णता पाण्याखाली गेली आहेत.अनेक घरातील कुटुंबांना मध्यरात्रीच्या सुमारास बाहेर काढून इतरत्र हलवण्यात आले, तर बांदा गवळीटेंब येतील लक्ष्मी विष्णू संकुलातील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर पाणी आल्याने तब्बल 40 ते 50 माणसे घरातच अडकून पडली होती. यात वृद्ध महिला लहान मुले यांचा समावेश होता. या सर्वांना बाबल अल्मेडा यांच्या टीमने बाहेर काढले सांगेली येथून आल्मेडासह त्याच्या पथकातील सर्व जण बांदा येथे 11 वाजण्याच्या सुमारास बांदा येथे   दाखल झाले, त्यानंतर त्यानी स्थानिक ग्रामस्थ युवकांच्या मदतीने अडकलेल्यांना बाहेर काढले. यावेळी बांदा उपसरपंच अक्रम खान गुरू सावंत प्रकाश पाटील यांनी या टीमसोबत काम केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग