शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: पत्रादेवीत गोवा बनावटीच्या दारूसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकजण ताब्यात

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 11, 2024 17:58 IST

सिंधुदुर्ग : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ...

सिंधुदुर्ग : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ लाख ५३ हजार ४४० रुपयांच्या दारूसह दीड लाखांची कार असा एकूण ४ लाख ३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास जुना पत्रादेवी-बांदा रोड, पोस्ट ऑफिसजवळ येथे करण्यात आली. महेश कृष्णा दाभोलकर (रा. सावंतवाडी) असे संशयिताचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली या पथकाने जुना पत्रादेवी-बांदा रोड, बांदा पोस्ट ऑफिस जवळ येथे सिल्व्हर रंगाची चारचाकी वाहनाची तपासणी केली असता यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे ४४ खोके अवैध साठा मिळून आला.याप्रकरणी महेश दाभोलकर याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यामध्ये २ लाख ५३ हजार ४४० रुपयांची दारू व १ लाख ५० हजार किमतीची गाडी असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

ही कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, गोपाळ राणे, दीपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजीत शिंदे यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास प्रदीप रास्कर करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस