शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: हुंबरट तिठा येथे गोवा बनावटीच्या दारूसह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त, चालकाला कोठडी 

By सुधीर राणे | Updated: March 25, 2024 13:09 IST

राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाची कारवाई

कणकवली: गोवा बनावटीच्या दारूची टँकरमधून छुप्या पद्धतीने सुरु असलेली वाहतूक राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने रोखली. महामार्गावरील हुंबरट तिठा येथे  करण्यात आलेल्या या कारवाईत २४ लाख ९० हजारांची दारू, १३ लाखांचा टँकर व अन्य मिळून ३७ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेला टँकर चालक प्रभूलाल भंवरलाल (वय-३४, दंतेडी-धुवाला, ता. मांडल, जि. मीलवाडा, राजस्थान) याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, कणकवली विभाग यांच्यातर्फे महामार्गावरील वाहनांची तपासणी सुरु आहे. या मार्गाने टँकरमधून चोरटी दारू वाहतूक सुरु असल्याची माहिती त्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने हुंबरट तिठा येथे सापळा रचून मुंबईच्या दिशेने जात असलेला टँकर क्रमांक (जी.जे. १२ ए.वाय. २३६) थांबविला. टेम्पोचा हौदा उघडला असता आतमध्ये एक कंपार्टमेंट आढळले. पाहणीत हौद्यामध्ये चार कंपार्टमेंट असल्याचे आढळले. यात गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळल्या. टँकर व दारू जप्त करून वागदे येथील राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात आणण्यात आली. कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन. एल. शिंदे, दुय्यम निरीक्षक एस. डी. पाटील, जे. एस. मानेमोड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एस. चौधरी, महिला जवान स्नेहल कुवेसकर, खान, शहा आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस