अवैध उत्खननप्रकरणी ३४ लाखांची दंड वसुली
By Admin | Updated: July 9, 2015 23:49 IST2015-07-09T23:49:28+5:302015-07-09T23:49:28+5:30
धडक कारवाई : उपविभागात चिपळूण तहसील कार्यालयात मंडणगड अव्वल

अवैध उत्खननप्रकरणी ३४ लाखांची दंड वसुली
रत्नागिरी : गौण खनिजांच्या अवैध उत्खननप्रकरणी जिल्ह्यात एप्रिल ते जून २०१५ या तीन महिन्यात धडक कारवाई करून ३४ लाख ७ हजार १६८ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पाच उपविभागात चिपळूण (२ लाख ७८ हजार) अव्वल असून, तहसीलमध्ये मंडणगड (९ लाख ३३ हजार ९८५) अव्वल आहे.वाळू, चिरा, दगड, माती आदी गौण खनिजांच्या उत्खननावर गेली दीड वर्षे बंदी होती. त्यामुळे गौण खनिजांचा लिलाव राज्यभर थांबले होता. याचा फटका जिल्ह्यालाही बसत होता. खासगीबरोबरच सर्व शासकीय बांधकामेही मोठ्या प्रमाणावर रखडली होती. त्यामुळे बंदी उठण्याची मागणी होत होती.
बंदी कालावधीत जिल्ह्यात एकूण १३१ प्रकरणांवर झालेल्या या कारवाईत सर्व तालुक्यांमधून एकूण वाळू, जांभा दगड आदी गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीवरील कारवाईपोटी गेल्या तीन महिन्यात ३४ लाख ७ हजार १६८ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. चिपळूण उपविभागाने यापैकी २ लाख ७८ हजाराच्या महसुलाची भर जिल्ह्याच्या तिजोरीत टाकली आहे. त्याखालोखाल खेडने २ लाख ३० हजार आणि रत्नागिरीने २ लाख २४ हजार रूपयांच्या दंडाची वसुली केली आहे.
मंडणगड तहसील कार्यालयानेही दंडाच्या वसुलीत अव्वल स्थान राखले असून, या तीन महिन्याच्या कालावधीत ९ लाख ३३ हजार ९८५ रूपयांचा दंड वसूल केला आहे. त्याखालोखाल चिपळूण तहसील कार्यालयाने ७ लाख ३८ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. इतर कार्यालयांकडून दोन लाखांपर्यंत दंड वसुली झाली आहे.
गौण खनिज बंदी उठविण्यात आल्याने जिल्ह्याच्या महसुलातही वाढ झाली आहे. गतवर्षी खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननाच्या वसुलीपोटी २२ कोटी ७७ लाख २७ हजार ३३ इतका महसूल मिळवत इष्टांकापेक्षा अधिक वसुली केली होती. सर्वाधिक वसुली रत्नागिरी उपविभागाने २,६५,९८,८७८ (१७७ टक्के) केली होती, तर तहसीलस्तरावर खेडने १,५०,४३,५५८ (१५० टक्के) वसुली केली होती. जिल्ह्यात एप्रिल ते जून महिन्यात गौण खनिज अवैध उत्खननप्रकरणी जिल्ह्यात करण्यात आलेली कारवाई महत्वपूर्ण मानली जात आहे.
वाळऊ, चिरा, दगड, माती आजी गौण खनिजांच्या उत्खननावर गेले दीड वर्षे बंदी होती. शासकीय बांधकामेही मोठ्या प्रमाणावर रखडली होती. त्यामुळे बंदी उठविण्याची मागणी करण्यात येत होती. उपविभागात करण्यात आलेल्या कारवाई बाबत मंडणगड तालुका अव्वल असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात १३१ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
तीन महिन्यात उपविभागीय
कार्यालयानी केलेली वसुली
उपविभागप्रकरणेवसुली
खेड०९२३०४५३
रत्नागिरी०२२४०००
चिपळूण०५२७८०००
दापोली००
राजापूर०४१५४१००
एकूण१८८८६५५३