शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

"शिक्षकांची ३० हजार पदे भरणार, जुन्या पेन्शनवरही विचार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 06:39 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिक्षकांसमोर घोषणा : सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) : राज्यात आता तुमच्या हक्काचे सरकार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी लक्ष केंद्रित करू. शिक्षण व्यवस्था दर्जेदार करण्यासाठी केंद्रप्रमुखाची रिक्त पदे भरण्याचे काम सुरू आहे. शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकरच भरली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केली. शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यम मार्ग काढू, असेही ते म्हणाले.

वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर,  प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, उपाध्यक्ष राजन कोरगावकर, आदी उपस्थित होते.

मातृभाषेतील शिक्षणावर भर राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वेक्षणामध्येदेखील शिक्षकांनी मोठी झेप घेतली आहे. यात सरकारी शाळांचा वाटा खूप मोठा आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी कामगिरी इंडेक्समध्ये एकूण १००० गुणांपैकी महाराष्ट्राला ९२८ गुण मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतील शिक्षणावर भर दिला जाईल. इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी  प्रयत्न सुरू आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिक्षकांसाठी टीआर लावण्याचा विचारडॉक्टर जसे वाहनावर डीआर लावतात तसे शिक्षकांसाठी टीआर लावण्याबाबत विचार होईल. जेणेकरून शाळेत लवकर पोहोचता येईल. शिक्षकांवर जास्त बंधने लादली जाणार नाहीत.

केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणारकेंद्रप्रमुखाच्या सर्व रिक्त जागा शिक्षक भरती झाल्यानंतर सहा महिन्यांत भरल्या जातील. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केला जाईल, असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेsindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षक