शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आंबोली घाटात थरारक पाठलाग करीत दारूसह २६ लाखांवर मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 16:45 IST

सिंधुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने बुधवार १ मे रोजी रात्री ८ वाजता आंबोली मुख्य धबधब्याजवळ ...

ठळक मुद्देआंबोली घाटात थरारक पाठलाग करीत दारूसह २६ लाखांवर मुद्देमाल जप्तराज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई

सिंधुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने बुधवार १ मे रोजी रात्री ८ वाजता आंबोली मुख्य धबधब्याजवळ थरारक पाठलाग करीत अवैध गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई केली आहे.

या कारवाईत १० लाख २२ हजार ४०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह एकूण २६ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी संशयित राजकुमार बाबुराव चव्हाण (३८, रा. कोलगाव, सावंतवाडी) व गौरव चंद्रकांत वेंगुर्लेकर (२८, रा. वेंगुर्ले) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.सावंतवाडी-बेळगाव या मार्गावरून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे यांच्या टिमने बुधवारी सायंकाळपासून सावंतवाडी-बेळगाव रस्त्यावर सापळा रचला होता.

त्यानुसार रात्री ८ च्या सुमारास या पथकाने आंबोली घाटात स्वीफ्ट कार (एम.एच.०२, बी. डी. २९७९) आणि इनोव्हा कार (एम.एच. १४, एएन. ३०३३) या कारना या पथकाने थांबण्याचा इशारा केला होता. मात्र, त्या न थांबता सुसाट वेगाने पुढे निघून गेल्या. त्यामुळे या दोन्ही कारचा थरारक पाठलाग करून आंबोली मुख्य धबधब्याजवळ त्या अडविण्यात आल्या.

त्यांची तपासणी केली असता स्विफ्ट कारमध्ये ७५० मिमी बॉटल असलेले दारूचे ६० बॉक्स तर इनोव्हा कारमध्ये १८० मिमी बॉटल असलेले दारूचे ९२ बॉक्स असे १० लाख २२ हजार ४०० रुपये किमतीचे १५२ बॉक्स आढळून आहे. त्यामुळे १० लाख २२ हजार ४०० रुपये किमतीच्या दारूसह १६ लाख ३० हजारांची दोन वाहने असा एकूण २६ लाख ५२ लाख ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच गोवा बनावटीची बिगर परवाना अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी कारचालक राजकुमार बाबुराव चव्हाण व गौरव चंद्रकांत वेंगुर्लेकर यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच पुढील चौकशीसाठी ७ दिवसांत येथील कार्यालयात हजर रहावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.महिन्यात ३६ लाखांचा मुद्देमाल जप्तराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत यांनी एप्रिल २०१९ मध्ये या भरारी पथकाचा पदभार स्वीकारला असून त्यांनी महिनाभराच्या आचारसंहिता कालावधीत १६ लाख ८३ हजारांची दारू व १९ लाख २० हजार रुपये किमतीची वाहने असा मिळून तब्बल ३६ लाख ३ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग