शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

राज ठाकरे २२ मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर, दौऱ्यामुळे मनसेत चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 4:34 PM

सामान्यांबरोबरच सर्वच स्तरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य तसेच केंद्र शासन अपयशी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे २२ मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.

ठळक मुद्देराज ठाकरेंच्या २२ मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावरदौऱ्यामुळे मनसेत चैतन्य

कणकवली : सामान्यांबरोबरच सर्वच स्तरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य तसेच केंद्र शासन अपयशी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे २२ मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात ते जनतेच्या विविध समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये निश्चितच नवचैतन्य संचारेल, असा विश्वास मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे व्यक्त केला.संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अमोल सावंत, दत्ताराम बिडवाडकर, शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.परशुराम उपरकर पुढे म्हणाले, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे सिंधुदुर्गात येत आहेत. कोकणातील जनतेच्या प्रश्नांची माहिती ते या दौऱ्यात घेणार आहेत. सध्याच्या शासनकर्त्यांबद्दल जनतेत नाराजी असून त्यांच्या समस्या राज ठाकरे ऐकून घेणार आहेत.

नाणार तसेच इतर प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी ठोस निर्णय या दौऱ्यात ते घेतील. त्यामुळे जनतेलाही या दौऱ्याबाबत उत्सुकता आहे. तसेच राज ठाकरेंकडे जनता वेगळ्या अपेक्षेने बघत आहे.

२२, २३ मे रोजीचा दौरा कार्यक्रमराज ठाकरे २२ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी येथे दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता कुडाळ येथे पत्रकार व मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. रात्री कुडाळ येथे मुक्काम केल्यानंतर २३ मे रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळ येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता मालवण येथे पदाधिकारी बैठक होईल.सायंकाळी ४ वाजता देवगड येथे कार्यालय उद्घाटन व देवगड पदाधिकारी बैठक होईल. सायंकाळी ५.३० वाजता कणकवली येथे वैभववाडी व कणकवली तालुक्यातील पदाधिकाऱ्याची बैठक होईल. कणकवली येथे रात्री मुक्काम केल्यानंतर २४ मे रोजी सकाळी ९ वाजता राज ठाकरे राजापूरकडे पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत, असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेsindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर