शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

देवगडमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, २ महिलेसह सहा जण ताब्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात २२ कोटींची किंमत

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 22, 2022 19:44 IST

२२ किलो ३७० ग्रॅम वजनाचे व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ (अंबरनीस) मिळून आला

देवगड (सिंधुदुर्ग) : व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमांविरुध्द स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचेकडून कारवाई करण्यात आली. देवगड पवनचक्की गार्डन समोर सापळा रचून ४ पुरुष व २ महिलांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे २२ किलो ३७० ग्रॅम वजनाचे व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ (अंबरनीस) मिळून आला.स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांना त्यांच्या बातमीदारामार्फत सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड या ठिकाणी व्हेल माशाची उल्टी (अंबरप्रोस) याची तस्करी होणार असल्याची माहीती प्राप्त झाली. प्राप्त माहिती खातरजमा करुन कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी संदिप भोसले यांनी दिले.त्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकरी व अंमलदार यांच्या पथकाने देवगड पवनचक्की गार्डन समोर सापळा रचून ४ पुरुष व २ महिलांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्याकडे २२ किलो ३७० ग्रॅम वजनाचे व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ (अंबरनीस) मिळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दराप्रमाणे व्हेल माशाच्या उल्टी सदृश्य पदार्थाची किंमत २२,३७,००, ००० इतकी असल्याचे स्पष्ट झालेले आहे.६ आरोपीकडून व्हेल माशाची उल्टी सदृश्य, एक चारचाकी व एक दुचाकी वाहन हस्तगत करण्यात आलेले आहे. नमूद आरोपीविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात भारतीय वन्यजिव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा तपास पुढील तपास देवगड पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, अनिल धूरी, प्रमोद काळसेकर, रुपाली खानोलकर, अमित तेली, संकेत खाइये, रवि इंगळे, प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनी केलेली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी