शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात २० मिनी बस दाखल होणार - मंत्री नितेश राणे; कणकवली बसस्थानकात अद्ययावत बसचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:31 IST

कणकवली : सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा आहे. या भागात एसटीच्या मिनी बसेसची सेवा सुरू करावी, अशी प्रवाशांची अनेक वर्षांची ...

कणकवली : सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा आहे. या भागात एसटीच्या मिनी बसेसची सेवा सुरू करावी, अशी प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण होण्यासाठी परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मी पाठपुरावा केलेला आहे. त्यानुसार महिन्याभरात २० मिनी बसेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तर सीएनजीवर चालणाऱ्या बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसमुळे एसटीच्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व आरामदायी होणार आहे, असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील कणकवली आगारात अद्ययावत बसेस दाखल झाल्या आहेत. या बससेवेचा शुभारंभ मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कणकवली आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, स्थानक प्रमुख प्रदीप परब यांच्यासह एसटीचे कर्मचारी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.मंत्री राणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सीएनजीवर चालणाऱ्या एसटीच्या बसेस मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील बसेस आलेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील बसेस लवकरच येणार आहेत. या बसेसची देखभाल करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची असली तरी त्या बसेस नादुरुस्ती होणार नाहीत, यासाठी प्रवाशांसह नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. एसटीच्या प्रवाशांसह प्रशासनाच्या ज्या-ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी महायुती सरकारची असणार आहे.

सुरक्षिततेचे उपाय वाढवले जातीलएसटी प्रवासी सुरक्षिततेबाबत पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, पुण्यामध्ये ज्या प्रकारची घटना घडली तशी घटना सिंधुदुर्गात घडता कामा नये या दृष्टीने सुरक्षिततेचे उपाय वाढवले जातील. त्याचप्रमाणे कणकवली बस स्थानकात असलेल्या पोलिस कक्षात जिल्हा अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याशी बोलून पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येईल.एसटीच्या महिला वाहक संगीता मोरे यांचा ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे दिल्लीत सन्मान करण्यात आला. याबद्दल कणकवली आगारातर्फे मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.एसटीतून फेरफटकाकणकवली एसटी आगारात बसचे लोकार्पण झाल्यानंतर मंत्री नीतेश राणे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी बसस्थानक परिसरात एसटीतून फेरफटका मारला. तसेच प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे आवाहन एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे ministerमंत्री