शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच १९६ इलेक्ट्रिक बस धावणार, पाच चार्जिंग सेंटर उभारणार

By सुधीर राणे | Updated: April 20, 2023 14:42 IST

चार्जिंग सेंटर एसटीच्या मालकीची

कणकवली: पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तसेच डिझेलच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने तब्बल ५१५० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ४५९३ बसेस राज्यातील विविध जिल्ह्याना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आगाराना १९६ इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार असल्याची माहिती एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली.ते म्हणाले, केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत  ५१५० इलेक्ट्रिक बस राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेत आणणार आहे. या इलेक्ट्रिक बस राज्यातील १०१ एसटी आगारांना देण्यात येणार असून त्यासाठी १७२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच चार्जिंग सेंटर सिंधुदुर्गात असतील. त्यामध्ये देवगड,वेंगुर्ला, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या ठिकाणांचा समावेश आहे. ही चार्जिंग सेंटर एसटीच्या मालकीची असतील. ती चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी येणारा अंदाजित खर्च कळविण्याबाबत वीज मंडळाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पूर्ण चार्जसाठी सहा तासांचा अवधी ही चार्जिंग सेंटर सुरू झाली की टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बस सिंधुदुर्गात धावू लागतील. एक इलेक्ट्रिक बस पूर्ण चार्ज होण्यासाठी सहा तासांचा अवधी लागतो. एकदा पूर्ण चार्ज केलेली बस ३५० किलोमीटर धावू शकेल. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. तसेच येथील जास्त भाग ग्रीन झोन अंतर्गत येत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने जास्त इलेक्ट्रिक बस म्हणजेच १९६ गाड्या सिंधुदुर्गसाठी देण्यात येणार आहेत. साधारणतः सहा महिन्यांचा कालावधी चार्जिंग सेंटरसह सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला लागेल. त्यानंतर या बस जिल्ह्यात धावतील. ४४ सीटच्या या बस असणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. ठाणे जिल्ह्यासाठी २३० इलेक्ट्रिक बस, रत्नागिरी जिल्ह्यासाठी १३७ बस, रायगड जिल्ह्यासाठी ४५ तर मुंबईसाठी २५ बस दिल्या जाणार आहेत असेही अभिजित पाटील यांनी सांगितले. सिंधुदुर्ग विभागासाठी अद्ययावत बस मिळणार!एसटी महामंडळाने नवीन गाडय़ांची बांधणी दापोडीसह राज्यातील तिन्ही कार्यशाळेत सुरू केली आहे. सध्या एसटीच्या सिंधुदुर्ग विभागात ३९३ गाड्या आहेत. अलीकडेच १० नवीन गाड्या मिळाल्या असून सावंतवाडी आगाराला त्या देण्यात आल्या आहेत. आगामी काळात सिंधुदुर्ग विभागाला अद्ययावत बस मिळणार आहेत. त्यात ४० मोठ्या  बस, २० एशियाड-हिरकणी बस व २० मिडी बस सिंधुदुर्ग विभागाला मिळणार आहेत. असेही अभिजित पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर