१९ वर्षे चौकशीच

By Admin | Updated: August 1, 2015 00:37 IST2015-07-31T22:34:18+5:302015-08-01T00:37:27+5:30

जिल्हा परिषद : ग्रामसेवकांच्या चौकशीला अंतच नाही

19 years of inquiry | १९ वर्षे चौकशीच

१९ वर्षे चौकशीच

रत्नागिरी : आतापर्यंत जिल्ह्यातील ५ ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांनी भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु असून, ८ ग्रामसेवकांवर जिल्हा परिषदेकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये अपहार, आर्थिक अनियमितता अशा प्रकरणामध्ये ते अडकले आहेत. अपहार प्रकरणातील ग्रामसेवकांची गेली १९ वर्षे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून खातेनिहाय चौकशी सुरु आहे. बोरगाव, कौंढर ताम्हाणे (गुहागर) ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामसेवक आर. आर. सुर्वे यांनी ग्रामपंचायत फंडामध्ये अपहार केला होता. भरणे ग्रामपंचायतीमध्येही ग्रामसेवक जी. बी. गावकर यांच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतीच्या निधीमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचे स्पष्ट झाले होते. ग्रामपंचायत, वहाळचे (चिपळूण) तत्कालीन ग्रामसेवक जी. टी. निर्गुण यांनी आपल्या सेवेच्या कालावधीत हजारो रुपयांचा गैरव्यवहार केला होता. पी. एम. पोवार या ग्रामसेवकांनी आपल्या प्रदीर्घ सेवेच्या कालावधीत मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ, तुळशी, कादवण आणि घराडी या ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारामध्ये घोळ घातला. राजापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी देवानंद रामलाल मासरकर यांनी महिला ग्रामसेविकेशी दूरध्वनीवरुन अश्लिल संभाषण केले होते.
ग्रामसेवक काशिनाथ दयाराम पवार, भागिरथ रघुनाथ नलावडे, तेजश्री सुरेश खटाव, रवींद्र दत्ताराम भाटकर, ग्रामविस्तार अधिकारी अरविंद सखाराम नागवेकर हेही विविध प्रकरणांमध्ये अडकले आहेत. यांची सहाय्यक आयुक्तांकडून विभागीय खातेनिहाय चौकशी सुरु आहे.
ग्रामसेवक सुधीर अनंत संख्ये, दिलीप सोनू भुवड, बापू रावबा भिसे, मनोहर आप्पा लोहार, जितेंद्र मुकुंद मांगले आणि जितेंद्र पवार यांच्यावर ग्रामपंचायतींमध्ये अफरातफर केल्याप्रकरणी भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदेकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती.
भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाल्याने यांच्यावर दोषारोप पत्रही बजावण्यात आले होते. त्याचवेळी त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली. ग्रामसेवक एस. आर. भोयर यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी गोंदिया जिल्ह्यात पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. या ग्रामसेवकाला १९९६ मध्ये निलंबित करण्यात आले होते. या सर्व ग्रामसेवकांची आयुक्त कार्यालयाकडून विभागीय चौकशी सुरु आहे. (शहर वार्ताहर)

खातेनिहाय चौकशी सुरू ...
जिल्ह्यातील काही ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची भ्रष्टाचारप्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू असून ८ ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर आता अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या साऱ्या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून कसून चौकशी सुरू असून, त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. निधीमध्ये अनियमितता, हजारो रूपयांचा गैरव्यवहार या व अन्य कारणांसाठी संबंधितांची चौकशी करण्यात आली होती.

खातेनिहाय चौकशी सुरू ...
जिल्ह्यातील काही ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची भ्रष्टाचारप्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू असून ८ ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर आता अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या साऱ्या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून कसून चौकशी सुरू असून, त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. निधीमध्ये अनियमितता, हजारो रूपयांचा गैरव्यवहार या व अन्य कारणांसाठी संबंधितांची चौकशी करण्यात आली होती.

Web Title: 19 years of inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.