शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा दारुसह १९ प्रवासी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:31 IST

बांदा : गोव्याहून रायगडकडे जाणाऱ्या खासगी आरामबसमधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर स्थिर निरीक्षण पथकाने (एसएसटी) ...

ठळक मुद्देबेकायदा दारुसह १९ प्रवासी ताब्यातखासगी आरामबसमधून बेकायदा दारू वाहतुक

बांदा : गोव्याहून रायगडकडे जाणाऱ्या खासगी आरामबसमधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर स्थिर निरीक्षण पथकाने (एसएसटी) कारवाई केली. गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या उरण (जि. रायगड)मधील बसचालक व क्लिनरसह १९ प्रवाशांना ताब्यात घेतले.या कारवाईत १ लाख ६५ हजार ४११ रुपयांच्या दारुसह एकूण १३ लाख ६५ हजार ४११ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. बांदा इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर १९ संशयित प्रवाशांच्या विरोधातील ही पहिलीच कारवाई आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली.

सायंकाळी उशिरापर्यंत बांदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.शनिवारी गोव्यातून येणारी खासगी आरामबस तपासणीसाठी थांबविण्यात आली. तपासणी दरम्यान प्रवाशांच्या सामानाच्या बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला.बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी चालक राजेंद्र सत्यवान कवडे (४५, सातारा), क्लिनर शैलेश हरिश्चंद्र सुर्वे (रा. हडी-मालवण), मनीष काशिनाथ पाटील (४३), संतोष चंद्रकांत पाटील (३२), मनोज जगन्नाथ पाटील (२९), विशाल वासुदेव ठाकूर (३३), राजेंद्र सुभाष ठाकूर (३३), संजय रमेश ठाकूर (३९), रोशन अरविंद जाधव (३०), कुणाल मधुकर भोईर (२९), दिनेश तुकाराम पाटील (३०), रतीश अर्जुन पाटील (२८), रोमेश भारत ठाकूर (३४), नरेश शिवराम म्हात्रे (६४), प्रणय बिपीन ठाकूर (२६), यज्ञेश गणेश भोईर (२६), समीर चंद्रकांत ठाकूर (२७), कल्पेश सुभाष ठाकूर (३०), अभिजीत देवानंद ठाकूर (२६, सर्व रा. भंडखळ, ता. उरण) यांच्यावर कारवाई करण्यात आली.या कारवाईत गोवा बनावटीच्या दारुचे विविध उंचीचे ब्रँड होते. या कारवाईत १ लाख ६५ हजार ४११ रुपयांच्या दारुसह एकूण १३ लाख ६५ हजार ४११ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत बसचालक व क्लिनरसह १७ प्रवाशांना ताब्यात घेतले.

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग