शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली विभागात महावितरणची १६.८५ कोटीची थकबाकी

By सुधीर राणे | Updated: September 12, 2023 12:19 IST

ग्राहकांनी विजबिले भरून कारवाई टाळावी

कणकवली: कणकवली विभागात महावितरणची एकूण थकबाकी १६ कोटी ८५ लाख रूपयापर्यत पोहोचली आहे. यात सर्वाधिक थकबाकी पथदिपांची आहे.पथदिपांच्या वीज पुरवठ्यापोटी ४ कोटी १४ लाख थकबाकी ग्रामपंचायतीकडून येणे आहे. तसेच घरगुती, व्यापारी, शासकीय, पाणीपुरवठा, औद्योगिक शेती या वीज ग्राहकांकडे थकबाकी आहे. त्यामुळे ग्राहकांनी विजबिले भरून सहकार्य करावे. तसेच वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई टाळावी. गणेश चतुर्थीपूर्वी ग्राहकांनी ऑनलाइन पध्द्तीने वीज बिल भरून  ०.२५ ची सवलत मिळवावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी केले आहे.कणकवली विभागात घरगुती ग्राहकांजवळ ४ कोटी २५ लाख, व्यापारी १ कोटी ३२ लाख, औद्योगिक १ कोटी ५१ लाख, कृषीपंप २ कोटी २८ लाख, शासकीय कार्यालय ४२ लाख, पाणी पुरवठा २ कोटी ७९ लाख, स्ट्रीट लाईट योजना ४ कोटी १४ लाख, शेतीपंप अन्य वापर १४ लाख एवढी थकबाकी आहे. या उपविभागातील ४७ हजार ७१० ग्राहकांकडे १६ कोटी ८५ लाख रुपये एवढी वीज वितरणची थकबाकी आहे.महावितरणला बाहेरील कंपन्यांकडून विज खरेदी करावी लागते. दर महिन्याला वीजचे पैसे द्यावे लागतात, त्यामुळे ग्राहकांनी दर महिन्याला आपले वीज बील भरणे अपेक्षित आहे. वीज बिल थकबाकीची कारवाई होण्याची वाट ग्राहकांनी पाहू नये. आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून दरमहा विज सेवेबरोबरच ग्राहकांकडील वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज वितरण कंपनीला आपली वीज बिले भरून सहकार्य करावे.

सिंधुदुर्गात ६० टक्के पेक्षा जास्त ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरणा करत असल्याचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी सांगितले. त्यामुळे गणेश चतुर्थीमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ग्राहकांनी पुढाकार घेवून थकित वीज बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरणKankavliकणकवली