शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील १६ गावे जोखीमग्रस्त जाहीर, साथ रोगाच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:45 IST

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभाग साथ रोगाच्या नियंत्रणासाठी सतर्क झाला असून, मागील तीन वर्षांत ज्या ठिकाणी लेप्टोचे ...

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभाग साथ रोगाच्या नियंत्रणासाठी सतर्क झाला असून, मागील तीन वर्षांत ज्या ठिकाणी लेप्टोचे रुग्ण आढळले, अशी १३ गावे व जलजन्य साथीची ३ गावे अशी एकूण जिल्ह्यातील १६ गावे जोखीमग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळी कालावधीत लेप्टो आणि जलजन्य आजार उद्भवतात. गेल्या तीन वर्षांत ज्या गावांमध्ये लेप्टोचे व जलजन्य  आजाराचे रुग्ण आढळले, अशी गावे जोखीमग्रस्त म्हणून जाहीर करून, या गावात विशेष लक्ष दिले जाणार आहे.त्यानुसार, या वर्षी देवगड तालुक्यातील रामेश्वर, कणकवली तालुक्यातील हळवळ व वागदे, मालवण तालुक्यातील चिंदर, कुडाळ तालुक्यातील किनळोस धनगरवाडा, घावनळे, तेंडोली, रानबांबुळी, धुरिटेमनगर, वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा, वेतोरे, सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, तळवडे परबवाडी अशी १३ गावे तर जलजन्य आजारासाठी कणकवली तालुक्यातील कोळोशी, वेंगुर्ला तालुक्यातील कनयाळ, गावतळे अशा ३ गावांचा समावेश आहे.

संपूर्ण जिल्ह्यात उपाययोजना : डॉ.सई धुरी

  • जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला साथरोग फैलावतात. त्यामध्ये लेप्टो, जलजन्य आजाराचे रुग्ण आढळतात.  आरोग्य विभाग या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याचे नियोजन करते.
  • त्यानुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण  जिल्ह्यात उपाययोजना राबविल्या जातात. त्यासाठी आवश्यक असलेली औषधे आणि आवश्यक साहित्य सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध करून दिली जातात.

साथरोगांच्या नियंत्रणासाठी पूर्व तयारी, नियोजन

  • या वर्षीही आरोग्य विभागाने साथ रोगांच्या नियंत्रणासाठी पूर्व तयारी व नियोजन केले आहे. ज्या गावात मागील तीन वर्षे साथीचे रुग्ण आढळले, अशी १६ गावे जोखीम ग्रस्त गावे जाहीर केली आहेत.
  •  या गांवामध्ये विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे, तर संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क केली आहे. कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण आणि पुरेसा औषध साठा उपलब्ध करून दिला आहे.
  • तसेच आपत्ती कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत,  अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी यांनी दिली.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल