‘जिल्ह्यातील १५३ शिक्षकांना वेतनश्रेणी मंजूर’
By Admin | Updated: March 3, 2015 21:32 IST2015-03-03T19:57:23+5:302015-03-03T21:32:38+5:30
प्राथमिक शिक्षकांना सेवेची १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणीच्या सर्व शिक्षकांना हा लाभ त्वरित द्यावा, अशी मागणी

‘जिल्ह्यातील १५३ शिक्षकांना वेतनश्रेणी मंजूर’
ओरोस : जिल्ह्यातील १५३ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. २०१४ ला सेवेची १२ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. अखिल सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रयत्नांचे हे यश असून, फरकाची रक्कम मार्च २०१५ पूर्वी देण्याची मागणी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती शिक्षक संघाचे अध्यक्ष म. ल. देसाई यांनी सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.प्राथमिक शिक्षकांना सेवेची १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणीच्या सर्व शिक्षकांना हा लाभ त्वरित द्यावा, अशी मागणी संघटनेने शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार २००२ मध्ये शिक्षणसेवक पदावर रूजू झालेल्या आणि मे २०१४ ला १२ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना ही वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील ३०, दोडामार्ग ९, वेंगुर्ले ३, कुडाळ २८, देवगड २२, वैभववाडी १३, मालवण १८, कणकवली ३०, आदींचा यामध्ये समावेश आहे.
(वार्ताहर)